नागपूर - नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वेदप्रकाश आर्य यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात वेगवेगळे वक्तव्य करून राज्यात सांप्रदायिकता पसरविण्याचा आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप या तक्रारीतून करण्यात आला आहे.
उपराजधानीत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तक्रार दाखल; अचडणीत येणार? - देशद्रोहाचा गुन्हा
देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारे असून त्यांच्या विरोधात पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या तक्रारीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. पोलिसांनी यासंदर्भात कुठलाही गुन्हा अद्याप दाखल केलेला नाही. या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलिस आयुक्तांना देण्यात आली.
देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तक्रार
गुन्हा दाखल करण्याची मागणी - देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारे असून त्यांच्या विरोधात पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या तक्रारीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. पोलिसांनी यासंदर्भात कुठलाही गुन्हा अद्याप दाखल केलेला नाही. या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलिस आयुक्तांना देण्यात आली.