नागपूर - भारतीय जनता पक्षात नव्या नेत्यांची भरती सुरू असताना नागपुरातील नेत्यांचा कोटा फुल्ल झाला आल्याचा दावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे भाजप प्रवेशाची आस लावून बसलेल्यांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे.
नव्या नेत्यांना भाजपमध्ये तूर्तास स्थान नाही, कोटा फुल्ल - बावनकुळे - उर्जामंत्री
राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांची भाजपमध्ये सुरू असलेल्या इन-कमिंग मोहिमेचे पडसाद नागपुरात देखील उमटतील काय? या प्रश्नावर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे.
राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांची भाजपमध्ये सुरू असलेल्या इन-कमिंग मोहिमेचे पडसाद नागपुरात देखील उमटतील काय? या प्रश्नावर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले. नागपुरात काँग्रेसचे चार-पाच नेतेच शिल्लक आहेत. त्यांच्या पक्षातील खालची फळी आधीच भाजपमध्ये आली आहे. त्यामुळे आमचा कोटा फुल्ल झाला असून काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसमध्येच राहावे, असा सल्ला राज्याचे उर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.