महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 4, 2022, 5:30 PM IST

ETV Bharat / city

Nagpur School Vandalism : नागपूरात दारुड्यांचा धिंगाणा; शाळेच्या आवारात तोडपोड

नागपूरमधील शाळेत अज्ञातांनी दारू पिऊन धिंगाणा घातला ( Nagpur School Vandalism ) आहे. सोमवारी शाळा उघडल्यावर हा प्रकार समोर आला आहे.

Nagpur School Vandalism
Nagpur School Vandalism

नागपूर - नागपूरच्या धरमपेठ परिसरातील बिशप कॉटन स्कुलमध्ये अज्ञातांनी दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला ( Nagpur School Vandalism ) आहे. शाळेच्या आवारात कुंड्याची तोडफोड करत दारूच्या बॉटल फोडल्याचे सोमवारी शाळा उघडल्यानंतर समोर आले. या घटनास्थळाची पाहणी पोलिसांनी केली आहे. अज्ञातावर गुन्हा दाखल करत चौकशी करणार असल्याची माहिती सीताबर्डी पोलिसांनी दिली आहे.

शाळेच्या आवारात करण्यात आलेली तोडफोड

दारुच्या बॉटल फोडल्या -नागपूरच्या धरमपेठ परिसरात बिशप कॉटन प्रायमरी शाळा असून, रविवारी सुट्टी असल्याने शाळा बंद होती. याच दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी दारू पिऊन धिंगाणा घातला असल्याचे समोर आले आहे. त्यात शाळेच्या आवारात असलेल्या झाडे लावलेल्या कुंड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. यासोबतच दारू पिऊन रिकाम्या बॉटलांच्या काचा सर्वत्र फेकण्यात आल्या आहेत.

शाळेच्या शिक्षिका प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना
घटना भीतीदायक - शाळेच्या दोन दिवस सुट्टी दरम्यान घडलेली घटना नक्कीच भीतीदायक आहे. ज्या पद्धतीने काही असामाजिक तत्त्वांनी शाळेच्या आतील भागात येऊन तोडफोड केली ही धक्कादायक बाब आहे. यात शाळा अगोदरच कोरोना काळात आर्थिक नुकसानीतून जात आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे कृत्य करू नये, असे आवाहन शाळेच्या शिक्षिका सोनिया सिंग यांनी व्यक्त केले.
शाळेच्या आवारात करण्यात आलेली तोडफोड

हेही वाचा -MNS Political analysts : राज ठाकरेंची राजकीय गोची? सातत्याने भूमिका बदलणे महागात?

ABOUT THE AUTHOR

...view details