नागपूर- महाराष्ट्रात लोकसभेच्या पहिल्या टप्यासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ७ वाजल्यापासूनच अनेक मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर हजेरी लावत आहेत. यामध्ये नवमतदारांपासून वृद्ध मतदारांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
Lok Sabha Election : नेहरूंच्या काळापासून सर्व लोकसभा निवडणुका पाहिलेल्या ८७ वर्षीय आजोबांनी केले मतदान
नागपूर येथील रामटेकमध्ये आज ८७ वर्षीय भास्कर झारखंडी यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
नागपूर येथील रामटेकमध्ये आज ८७ वर्षीय भास्कर झारखंडी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यापासून ते आजपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाच्या पद्धतीबाबत बोलताना आजोबा म्हणाले, मी वयाच्या २१ व्या वर्षापासून मतदान करत आहेत. आता जवळपास ५० वर्षे झाली मी मतदान करत आहे. १९५३ पासून मी मतदान करत आहे. पूर्वीपेक्षा आता मतदानाची प्रकीया बरीच सोपी झाली आहे. ईव्हीएम आल्यानंतर मतदान करणे सोपे झाले आहे. पूर्वीही मतदारांमध्ये बराच उत्साह असायचा. मतदान म्हणजे जणू उत्सव असायचा.