नागपूर -जिल्ह्यातकोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी निर्बंध अद्यापही लागू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी या निर्बंधांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. काल रात्री मेडिकल चौकातील ट्रिलीयम मॉलमधील बारमध्ये कोविड नियमाचे उल्लंघन करत लोकांनी गर्दी केली होती. याची माहिती मिळाल्यानंतर मनपा आणि इमामवाडा पोलिसांच्या पथकाने रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास संयुक्तरित्या कारवाई केली.
बार मालकाकडून निर्बंधांचे उल्लंघन -
दरम्यान, या बारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी केली असल्याची माहिती मनपाचे पथक आणि पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस आणि मनपाच्या पथकाने याठिकाणी पोहचत कारवाई केली. येथे गर्दीला रोखण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. तसेच 50 टक्के क्षमतेने काम करण्याच्या सूचना असतानाही प्रत्येक टेबलवर लोक बसून होते. यावेळी सोशन डिस्टन्सिंगचाही फज्जा उडवण्यात आला होता. या कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बार मालकाला 30 हजाराचा दंड आकारण्यात आला.
हेही वाचा -येत्या सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न - उदय सामंत