महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ashish Jaiswal : 'संजय पवारांचा पराभव दुर्दैवी, पण जे कोणी फुटले असतील ते...'; आशिष जैस्वालांनी स्पष्टचं सांगितलं - आशिष जैस्वाल संजय पवार

संजय पवार यांचा पराभव दुर्दैवी आहे. जे कोणी अपक्ष फुटले असतील ते लपून राहणार नाही. कारवाई होईलच, असे आशिष जैस्वाल यांनी स्पष्ट ( Ashish Jaiswal Reaction On Rajyasabha Election Result ) केलं.

Ashish Jaiswal
Ashish Jaiswal

By

Published : Jun 12, 2022, 5:05 PM IST

नागपूर - संजय पवार यांचा पराभव दुर्दैवी आहे. बाळासाहेब ठाकरे हे आमचं दैवत आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता असलेले संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. यात ज्यांनी कुणी विरोधात मतदान केले असेल, तर ते मतदान काही लपून राहणार नाही. संशयाची सुई नक्कीच काही अपक्षांवर आहे. याची शहानिशा निश्चितपणे होईल, आम्ही निष्ठेने काम करत आहे, असे अपक्ष आमदार आशिय जैस्वाल यांनी म्हटलं आहे. तसेच, जे कोणी अपक्ष फुटले असतील ते लपून राहणार नाही. कारवाई होईलच, असेही जैस्वाल यांनी स्पष्ट ( Ashish Jaiswal Reaction On Rajyasabha Election Result ) केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आशिष जैस्वाल म्हणाल की, दोन राष्ट्रवादीचे नेते तुरुंगात असल्यामुळे मतदान करता आला नाही. त्यामुळे हा नियतीनेच एक प्रकारे पराभव केला आहे. संशयाची सुई काही अपक्षांवर आहे, त्यांची नावे समोर येतील. आमदारांची नाराजी सर्वच नाहीतर काही मंत्र्यांबद्दल होती. त्यामुळे आधी बोललो होतो की त्या नाराजीला निवडणुकीशी जोडून पाहू नये. आताही तेच म्हणतोय विधानपरिषदेत नक्कीच जास्त तयारी करावी लागेल, असेही सूचक वक्तव्यही जैस्वाल यांनी केलं.

आशिष जैस्वाल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

आत्मचिंतन करुन निवडणुकांना समोर जाऊ -आम्हाला अपेक्षित होते की, पहिल्या पसंतीत संजय पवार हे निवडून येतील. पण, तसे झाले नाही हा तांत्रिक पराभव आहे. कारण मतांचा गोळा बेरीजचे काही गणित हे नक्कीच बिघडले आहे. यातून आत्मचिंतन करून निवडणुकांना समोर जाऊ. विधान परिषदसाठी नक्कीच चांगले प्रयत्न करावे लागतील. निधीसाठी असलेली आमदारांची नाराजीला राज्यसभा निवडणुकीशी जोडू नये. कारण सर्व मंत्र्याबद्दल नाराजी व्यक्त केली नव्हती. काही दोन तीन मंत्र्याबद्दलचा तो विषय होता. मुख्यमंत्री यांनी तो प्रश्न सोडवला आहे, असेही जैस्वाल यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा -... तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details