महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

देशात मॉब लिंचींग आहे, हे संघाने मान्य करावे; ओवैसींचे संघावर टिकास्त्र

राफेलच्या चाकासमोर संरक्षणरमंत्र्यांनी लिंबू ठेवल्याचा आम्ही विरोध करत नाही. परंतु, ज्यावेळी हा संस्कृतीचा एक भाग मानला जातो, त्यावेळी देशातील इतर नागरिकांनाही त्यांच्या धर्मानुसार वागू दिले पाहिजे, असे मत एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केले आहे.

देशाच्या संविधानात धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आले असले, तरिही भाजप ते तोडण्याचे काम करत आहे, असा आरोप असदुद्दीन ओवैसी यांनी केला.

By

Published : Oct 12, 2019, 8:53 AM IST

नागपूर - राफेलच्या चाकासमोर संरक्षणरमंत्र्यांनी लिंबू ठेवल्याचा आम्ही विरोध करत नाही. परंतु, ज्यावेळी हा संस्कृतीचा एक भाग मानला जातो, त्यावेळी देशातील इतर नागरिकांनाही त्यांच्या धर्मानुसार वागू दिले पाहिजे, असे मत एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केले आहे. तसेच देशाच्या संविधानात धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आले असले, तरिही भाजप ते तोडण्याचे काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

देशाच्या संविधानात धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आले असले, तरिही भाजप ते तोडण्याचे काम करत आहे, असा आरोप असदुद्दीन ओवैसी यांनी केला.

उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील एमआयएमच्या अधिकृत उमेदवार किर्ती डोंगरे तसेच मध्य नागपूरमधील उमेदवार अब्दुल शरीक पटेल यांना प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षप्रमुख ओवैसी यांनी पंतप्रधानांसह भाजप तसेच संघावर जोरदार टीका केली.

या देशात एक धर्म, एक पक्ष राहणार असल्याचे हे सरकार म्हणते. आज संघ आणि भाजप सावरकरांनी सांगितलेले हिंदुत्व मांडत आहे. मात्र, हा देश सर्व धर्मांचा आहे. या ठिकाणी सर्व धर्मांचा सन्मान झाला पाहिजे, असे मत ओवैसी यांनी मांडले. 'तुम्ही लिंबू ठेवा, नाहीतर आणखी काही'; मात्र आमच्यावर बंधने आणू नका, असे त्यांनी सांगितले. नागपुरात येऊन संघाबद्दल न बोलल्यास मला त्रास होईल, असे ते म्हणाले. तसेच संघाने आमचा आवाज ऐकावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा VIDEO : ओवैसी 'पतंग' उडवित होते...

नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात सरसंघचालकांनी देशात मॉब लिंचींग होत नसल्याचे सांगितले होते. तसेच हा शब्द पाश्चिमात्य देशांतील संस्कृतीमधून आल्याचे ते म्हणाले होते. यावर टीका करताना,संघ देशातील मॉब लिंचींगचे प्रकार नाकारत असल्याचे ओवैसी यांनी म्हटले.

हेही वाचा जे आजोबा करू शकले नाहीत, ते नातू काय करणार; असदुद्दिन ओवैसींचा शेकापला टोला

मात्र, झारखंडमध्ये जमावाने एकाचा खून केला. या प्रकरणात शिक्षा झालेल्या आरोपीला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हार घातला होता. हेच तुमचे संस्कार आहेत का, हे संघाने सांगावे, असा प्रश्न त्यांनी विचारला. पुढे बोलताना, आम्ही जिन्हाला नाकारून गांधी आणि आंबेडकरांना स्वीकारल्याचे ओवैसी यांनी सांगितले. तसेच हा देश आमचा आहे; आणि यासाठी तुमच्याकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details