नागपूर -अरुण गवळीला संचित रजा(पॅरोल) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केला आहे. न्यायालयाने गवळीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. कुटुंबीयांना भेटण्यासाठी अरुण गवळीने संचित रजेसाठी अर्ज केला होता. अरुण गवळी मुंबई येथील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. मध्यंतरी नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असताना नागपूर मध्यवर्ती कारागृहातील अनेक बंदीवनांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये डॉन अरुण गवळीचा देखील समावेश होता. तेव्हापासून गवळी पॅरोल मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. यावेळी त्यांनी कुटुंबीयांना भेटण्यासाठी अरुण गवळीने संचित रजेसाठी अर्ज केला होता. जो न्यायालयाने मंजूर करत अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा दिली आहे.
'ही' आहे अरुण गवळीच्या जन्मठेपेची पार्श्वभूमी
अरुण गवळीला २८ दिवसांचा पॅरोल मंजूर - नागपूर अरूण गवळी पॅरोल
न्यायालयाने गवळीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. कुटुंबीयांना भेटण्यासाठी अरुण गवळीने संचित रजेसाठी अर्ज केला होता.
मुंबईतील शिवसेना नेत्याच्या खुनाच्या आरोपात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचा सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीशी संपत्तीवरुन वाद होता. त्यानंतर सदाशिव सुर्वेने अरुण गवळीच्या गँगमधील दोघांना जामसांडेकर यांची हत्या करण्याची सुपारी दिल्याचा आरोप आहे. 2 मार्च 2007 रोजी जामसंडेकर यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. गवळीला या घटनेनंतर एका वर्षाने पकडण्यात आले होत. त्यानंतर न्यायालयाने गवळीला जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. त्याअंतर्गत गेल्या काही वर्षांपासून ते नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत.