महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लसीकरणापासून एकही नागरीक वंचित राहू नये यासाठी दक्षता घ्या - अमित देशमुख - कोरोना लसीकरण बातमी

लसीकरणापासून एकही नागरीक वंचित राहू नये यासाठी दक्षता घ्या असे आदेश अमित देशमुख यांनि दीले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे कोविड बाबत अमित देशमुख यांनी आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.

नागपूर
नागपूर

By

Published : Apr 26, 2021, 9:52 PM IST

नागपूर -कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेपासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाचे लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी लसीकरणाबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करत स्वयंस्फूर्तीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे. लसीकरणापासून एकही नागरीक वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घेण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे कोविड बाबत अमित देशमुख यांनी आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.

शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. यामुळेच आज कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत आहे. मेयोतील कोरोना संसर्गातून बाहेर पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जवळपास 90 टक्के आहे. ही बाब समाधानकारक आहे. कोविड संकटाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी कोरोनाची काही लक्षणे आढळल्यास घरगुती उपचार करण्यात वेळ न दडवता तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी. बरेचदा पेशंट अत्यव्यस्थ झाल्यानंतर डॉक्टरांकडे येतात. यामुळे डॉक्टरांच्या प्रयत्नांवर मर्यादा पडतात. यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. यापुढे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही. गरजेप्रमाणे रेमडेसिवीर औषध उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागरिकांनीही ठराविक औषधाचा आग्रह करु नये असे अमित देशमुख म्हणाले. येत्या १ मेपासून १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु होणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गातून बाहेर पडलेल्या रुग्णांनी पोस्ट कोविड सेंटरचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ऑक्सीजन प्रकल्पाला गती देण्याचे आदेश -

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त अनुदानातून मेयो येथे ऑक्सिजन प्रकल्प सुरु करण्याच्या कामाला गती देण्यात यावी. कोरोना संसर्गामुळे वैद्यकीय विभागासमोर खूप आव्हाने आहेत. वाढत्या रुग्णांची संख्या पाहता महाविद्यालय व रुग्णालयासाठी नवीन प्रशासकीय अधिकाऱ्यांची तसेच नर्सिंग स्टाफची पदभरती लवकरच करण्यात येईल अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details