महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धम्मचक्र प्रवर्तन दिन : दीक्षाभूमीवर लोटला भीमसागर

14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अनुयायांसोबत नागपूरमध्ये हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. ही घटना विजया दशमीला घडल्याने दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी दीक्षाभूमीवर आंबेडकर अनुयायी बाबसाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमतात.

दीक्षाभूमीवर भिमसागर लोटला

By

Published : Oct 8, 2019, 12:43 PM IST

Updated : Oct 8, 2019, 1:18 PM IST

नागपूर - 63व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील दीक्षाभूमी परिसरात बौद्ध अनुयायांनी गर्दी केली आहे.

63व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील दीक्षाभूमी परिसरात बौद्ध अनुयायांनी गर्दी केली आहे.

14 ऑक्टोबर 1956 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसोबत नागपूरमध्ये हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. ही घटना विजया दशमीला घडल्याने दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी दीक्षाभूमीवर आंबेडकर अनुयायी भगवान बुद्ध आणि बाबसाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमतात.

हेही वाचा धम्मचक्र दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमांचे आयोजन, अनेक देशातील दिग्गज राहणार उपस्थित

तसेच यादिवशी काही लोक स्वतःच्या धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. आजच्या या सोहळ्याला जपानचे भंते नोबुहीरो कुबोडेरा, शीनचीरो किशी, सिईगो ससहारा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.

Last Updated : Oct 8, 2019, 1:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details