नागपूर -गेल्या आठवड्यात शनिवारी नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रामदासपेठ भागातील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये अतिशय शिताफीने धाडसी चोरीची घटना ( Theft from SBI Bank ATM ) घडली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचा कोणताही सुगावा लागत नसल्याने पोलिसांनी परिसरातील 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सुमारे शेकडो ( CCTV ) तासांचे फुटेज तपासले. तेव्हा आरोपीचा पोलिसांना सुगावा लागला. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे तीन दिवस आरोपीचा शोध घेतल्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला आहे.
महत्वाचे म्हणजे आरोपीने एटीएम मशीनची ( ATM ) तोडफोड न करता 5 लाख 80 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव पवन दरवाई ( Pawan Darwai ) असे असून तो कर्जबाजारी असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी दुपारी एटीएम मध्ये चोरी झाल्याची बाब समोर आली होती. चोरट्यांने रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत चोरट्यांनी आपला डाव साधला होता. अटीएम मध्ये चोरी झाल्याची बाबा सुरुवातीला कुणाच्याही लक्षात देखील आली नाही. एटीएम मधील रक्कम संपल्यामुळे एटीएम मध्ये चोरी झाल्याची बाब समोर आली आहे.
कर्जबाजारीपणाला कंटाळून केली चोरी -आरोपी पवन दरवाईला दारू आणि जुगार खेळण्याचे व्यसन जडले आहे. शोक पूर्ण करण्याच्या नादात तो कर्जबाजारी रोड बसला आहे एवढेच नाही तर त्याने स्वतःची दुचाकी आणि मोबाईल देखील गहाण ठेवला होता पवन ने अतिशय एटीएम मशीन चे दार उघडून त्यातील पाच लाख 82 हजार रुपये लंपास केले होते अतिशय सुरक्षित असलेल्या मशीन मधून पवन येईल कशाप्रकारे कुठलेही तोडफोड न करता पैसे चोरले याचा खुलासा मात्र अद्याप पोलिसांनी केलेला आहे