नागपूर -व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमधून अचानक काढल्याचा राग मनात धरून एका माजी ग्रुप सदस्याने अॅडमीनवर हल्ला केल्याची घटना नागपुरात घडली. सुनील अभिचंदानी असे जखमी अॅडमीनचे नाव असून ते नागपूर महानगर पालिकेत ठेकेदार आहेत. चंद्रमणी यादव आणि छत्रपती यादव अशी आरोपींची नावे आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी पळून गेलेले असल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमधून काढल्याचा रागातून अॅडमीन वर प्राणघातक हल्ला; आरोपींचा शोध सुरू - नागपूर व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमीन जखमी बातमी
ग्रुप अॅडमीनने कोणतेही स्पष्टीकरण देण्याची संधी न दिल्याचा राग मनात धरून आरोपी चंद्रमणी यांनी सुनील अभिचंदानी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये चंद्रमणी यांचा भाऊ छत्रपती यादव हे देखील सहभागी होते. जखमी झालेल्या सुनील अभिचंदानी यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची तक्रार सदर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असता दोन्ही आरोपी पळून गेले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सुनील अभिचंदानी नामक व्यक्तीने काही मित्रांना एकत्र घेऊन एक ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपवर आरोपी चंद्रमणी यादव हे देखील होते. काही दिवसांपूर्वी यादव यांनी ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर अनेकांनी ग्रुप अॅडमीनकडे या संदर्भात एक तक्रार केली होती. त्यांनतर ग्रुप अॅडमीन सुनील अभिचंदानी यांनी चंद्रमणी यादव याला ग्रुपवरून काढून टाकले होते. ग्रुप अॅडमीनने कोणतेही स्पष्टीकरण देण्याची संधी न दिल्याचा राग मनात धरून आरोपी चंद्रमणी यांनी सुनील अभिचंदानी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये चंद्रमणी यांचा भाऊ छत्रपती यादव हे देखील सहभागी होते. जखमी झालेल्या सुनील अभिचंदानी यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची तक्रार सदर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असता दोन्ही आरोपी पळून गेले आहेत.