नागपूर:आर्थिक गुन्ह्यांची राजधानी असलेल्या नागपूरमध्ये (Fake Bracelet Mortgage Nagpur) आता फसवणुकीच्या घटना ( bullion dealer fraud) सर्रासपणे घडताना दिसत आहे. एका इसमाने बनावट सोन्याची ब्रेसलेट देऊन सराफ व्यावसायिकाची १ लाख ६० हजार रुपयांनी फसवणूक (fake gold bracelet dealer fraud) केली आहे. पैशाची गरज असल्याचं सांगून त्याने सराफा व्यापाऱ्याकडे ब्रेसलेट गहाण ठेवले (bracelet pawning) होते. अशाच प्रकारे आणखी एका इसमाची दीड लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. याबाबत पाचपावली पोलीस ठाण्यात (Pachapavali police station) तक्रार दाखल करण्यात होती. पोलिसांनी आरोपीला अटक (Accused arrested for fraud with bullion) केली आहे. (mortgaging fake bracelets in Nagpur)
दोन ते तीन दुकानदारांचा फसवणूक-अक्षय हिम्मतकुमार सोनी (२५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अक्षय हा ठाणे येथील रहिवासी आहे. फ्लॅटची किस्त भरायची असल्याचे कारण सांगून आरोपी अक्षयने पाचपावली हद्दीत असलेल्या सुरभी ज्वेलर्स दुकानात ते ब्रेसलेट गहाण ठेवले. मला ब्रेसलेट विकायचे नाही एक महिन्याची अडचण असल्याचे सांगून आरोपीने व्यापाऱ्याकडून १ लाख ६० हजार घेतले होते. ब्रेसलेट गहाण ठेवताना आरोपीने नाशिक येथील सराफा दुकानाचे बिल सादर केले. त्यामुळे नागपूरच्या सराफा व्यापाऱ्याचा अक्षयवर विश्वास बसला. अशाच प्रकारे आरोपी अक्षयने नागपूरातील दोन ते तीन दुकानदारांची फसवणूक केली आहे.