नागपूर- शेंगदाण्यांना रंग लावून पिस्ता म्हणून विक्री करणाऱ्या टोळीचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला आहे. लालगंज परिसररातील कारखान्यात धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. शेंगदाण्याचे दोन भाग करून त्यावर पिस्त्याचा रंग लावून पिस्ता म्हणून तो विक्री केला जात असे.
नागपूरमध्ये बनावट पिस्ता विकणारी टोळी गजाआड, दीड टन माल जप्त - नागपुरातील गुन्हेगारी
शेंगदाण्याचे दोन भाग करून त्यावर पिस्त्याचा रंग लावून पिस्ता म्हणून तो विक्री केला जात असे.
बनावट पिस्ता विकणारी टोळी गजाआड
ग्राहकांची दिशाभूल करून ग्राहकांना फसविणाऱ्या या टोळीकडून १६९० किलो रंग लावलेले शेंगदाणे जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेली वस्तू प्रयोग शाळेत पाठविण्यात आली आहे. प्रयोग शाळेच्या निकालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.