नागपूर- प्लास्टिकवर बंदी असतांना सर्रासपणे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा उपयोग केला जातो. यामुळे प्लास्टिक पर्यावरणाला धोका पोहचवत आहे. तसेच मूके प्राणी, खासकरून गायीच्या पोटात खाण्यातून प्लास्टिक जाणे हे नवीन नाही. परंतु, नागपूरात एका गायीच्या पोटातुन शस्त्रक्रिया करून तब्बल 80 किलो प्लास्टिक काढण्यात आले आहे.
तोंडातुन फेस आल्याने उघड झाला प्रकार
शहरात मोकाट फिरणाऱ्या गायी अनेकदा कचराकुंडी किंवा कोणाच्याही घरासमोर टाकलेले शिळे अन्न खाऊन जगतात. यासोबत अनेकदा त्यांच्या पोटात प्लास्टिक सुद्धा खाण्यात जाते. असाच एक प्रकार महालच्या बडकस चौक परिसरात घडला आहे. चौकात गाय फिरत असतांना गायीच्या तोंडातुन अचानक फेस निघतांना दिसून आले. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करून पोटातुन तब्बल 80 किलो प्लॅस्टिक काढण्यात आले आहे. गायीवर गोरक्षण सभेत उपचार करण्यात आले आहेत.
हेही वाचा -राज्यातील हजारो रिक्षा चालकांचा हिरमोड; परिवहन विभागाच्या पोर्टलच पडले बंद