नागपुर -राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. नागपूरमध्ये आणखी चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 9 वर गेली आहे. गुरुवारी ज्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती, त्याच्याच संपर्कातील इतर चौघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
#CORONA : नागपुरात आढळले कोरोनाचे आणखी 4 नवे रुग्ण, एकूण संख्या 9 वर - नागपूर कोरोना रुग्ण
राज्यात आतापर्यंत 136 जणांना कोरोनाची लागण झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 18 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून त्यात एका तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर
हेही वाचा...महाराष्ट्रातील कोरोनाबाधित मृतांची संख्या पाचवर, मुंबईत 63 वर्षीय महिलेचा मृत्यू
गुरुवारी दिल्ली येथून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी चौघांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांना उपचारासाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.