महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरात चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्याची नागरिकांनी काढली विवस्त्र धिंड; व्हिडिओ व्हायरल - नागपुरात अत्याचार

एका 35 वर्षीय व्यक्तीने 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पीडित चिमुकलीच्या आईच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केल्याने अनुचित घटना टळली आहे.

NAGPUR
4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

By

Published : Dec 2, 2019, 7:56 PM IST

Updated : Dec 2, 2019, 9:21 PM IST

नागपूर- येथे 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका 35 वर्षीय आरोपीला नागरिकांनी चांगलाच चोप दिला आहे. नागरिकांनी आरोपीची विवस्त्र धिंड काढल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हैदराबाद येथील लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना ताजी असताना नागपूर शहरातील पारडी भागात एका नराधमाने 4 वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे करत बलात्काराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना पीडित चिमुकलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केल्याने अनुचित घटना टळली आहे. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरोपीला चोप देऊन त्याची विवस्त्र धिंड काढली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. आरोपीला विवस्त्र करून त्याची धिंड काढल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा - नागपुरात 'ब्रेकफास्ट विथ मेयर'मध्ये जनतेचा महापौरांशी थेट संवाद

पारडी विभागातील पुनापूर रोड परिसरात पीडित कुटुंब राहते. पीडित कुटुंबाच्या परिचयात असलेल्या जवाहर बाबुराव वैद्य याचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. आरोपी पीडितेच्या घरी येऊन ती एकटी असल्याचे दिसताच त्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. मुलीने आणि तिच्या आईने आरडाओरड करताच परिसरातील नागरिक गोळा झाले आणि त्याला चोप देत पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - वाळू माफियांचा वाद, दगडाने ठेचून एकाचा खून

Last Updated : Dec 2, 2019, 9:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details