नागपूर :जिल्ह्यात लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी आलेल्या अहवालात 2,587 कोरोना बाधित मिळून आले आहे. यात सोमवारी मिळून आलेल्या 2,597 रुग्णाच्या तुलनेत 290 अधिक रुग्णांची भर पडली. तेच एकाच दिवसात 18 रुग्णांचा मृत्यूच्या नोंद झाली आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात तीन हजार 103 रुग्ण मिळून आले असून, 27 जणांच्या मृत्यूची नोंद झाली.
लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही कोरोन रुग्णसंख्या वाढती; 2,587 रुग्णसंख्येसह 18 जणांचा बळी जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक..
नागपूर जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबवल्या जात आहे. यात लॉकडाऊन सोबत टेस्ट, ट्रेस आणि ट्रीटमेंट या सूत्राचा अवलंब केला जात आहे. शहरात अत्यावश्यक सेवा सुरू असतांना आता शहरातील काही भागात उडानपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. तेच किराणा, फळ भाजीपाला आणि मास विक्रीला वेळेचे निर्बंध घालण्यात आले आहे. विशेष म्हणजे बाजार परिसरात असणाऱ्या दुकाना बंद करण्यात आले असून शहरातील विविध भागात एकटे असणाऱ्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्यात मंगळवारी 13 हजार 363 जणांची तपासणी करण्यात आली. यात शहरात 1 हजार 921 जण बाधित मिळून आले तर ग्रामीण भागात 664 आणि शहरात 2 असे एकूण 2 हजार 587 रुग्ण बाधित आले आहे. यात शहरात सर्वाधिक 12 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या तीनशेच्या घरात रुग्ण अतिक्षता विभागात उपचार घेत आहे. जिल्ह्यात 18 हजार 980 रुग्ण हे पॉझिटिव्ह असून, शहरातील 15 हजार 509 रुग्णांचा समावेश आहे.
पूर्व विदर्भात काय परिस्थिती..
पूर्व विदर्भात मंगळवारी 3 हजार 103 रुग्ण बाधित मिळून आले. सोमवारच्या तुलनेत रुग्णसंख्या पाहता 229 रुग्ण अधिक मिळून आले आहे. मागील दोन दिवसात सहा जिल्ह्यात 3 हजार 595 रुग्ण कोरोनामुक्त झाले. नागपूरात 2,587 तर चंद्रपूर जिल्ह्यात 121 रुग्ण बाधित आढळले आहेत. भंडारा जिल्ह्यात 72, गोंदिया 50, वर्धा 224, तर गडचिरोली 49 रुग्णांची नोंद करण्यात आली. पूर्व विदर्भात कोरोनामुळे 27 जण कोरोनाने दगावले असून, यात नागपूरात 18, वर्ध्यात 6, गडचिरोली 1 तर चंद्रपूर जिल्ह्यातील 2 जणांचा समावेश आहे.
हेही वाचा :राज्यात कोरोनाची दुसरी लाट; केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आल्या...!