महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरात 19 वर्षांच्या मुलाने केला वडिलांचा खून; आरोपीला अटक - young boy stabbed his father

शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अमर नगर परिसरात एका मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार क्षुल्लक कारणावरून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

young boy stabbed his father
नागपुरात 19 वर्षांच्या मुलाने केला वडिलांचा खून; आरोपीला अटक

By

Published : Nov 26, 2020, 10:52 PM IST

नागपूर - शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अमर नगर परिसरात एका मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार क्षुल्लक कारणावरून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सम्राट रंगारी (वय ५५) असे मृत वडिलांचे नाव असून सिकंदर रंगारी(वय १९) या त्यांच्या मुलानेच हत्या केली आहे. प्राथमिक माहिती नुसार आरोपी सिकंदरचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समजते. हिंगणा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

नागपुरात 19 वर्षांच्या मुलाने केला वडिलांचा खून; आरोपीला अटक
आरोपी सिकंदर हा एमआयडीसी येथील एका कंपनीत कामाला आहे. घटनेच्या वेळी मृत सम्राट आणि आरोपी सिकंदर हे दोघेही घरीच होते. त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून बाचाबाची सुरू झाली. मात्र काही वेळातच त्याला हिंसक स्वरुप प्राप्त झाले. कोणालाही सुगावा लागण्याआधी सिकंदरने त्याच्या जवळील शस्त्राने सपासप वार करून सम्राट यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. त्यानंतर आरोपीने आपल्या वडिलांचा मृतदेह घराच्या बाहेरील रस्त्यावर फेकून दिल्याचं तपासात पुढे आलं आहे.
आरोपी मनोरुग्ण असण्याची शक्यता
आरोपी सिकंदरने वडील सम्राट रंगारी यांचा मृतदेह रस्त्यावर फेकल्यानंतर स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. एवढचं नाही तर आरोपीने घरात गेल्यानंतर अंगावरील कपडे काढून जेवण केल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित तरुण मनोरुग्ण असल्याचं बोललं जातं आहे. सध्या एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली असून तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details