नागपूर - राज्याची उपराजधानी नागपुरात बुधवारी दिवसभरात 13 नवीन कोरोनाबाधित रुग्ण पुढे आले आहेत. यामध्ये पाच एसआरपीएफ जवानांचादेखील समावेश आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 387 इतकी झाली आहे.
नागपुरात बुधवारी 13 नवे कोरोनाबाधित, एकूण रुग्णसंख्या 387 - 13 नवे कोरोना रुग्ण नागपूर
बुधवारी 12 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे एकूण डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या 303 इतकी झाली आहे. या शिवाय सात रुग्णांचा मृत्यूदेखील झाला आहे.
बुधवारी 12 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे एकूण डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या 303 इतकी झाली आहे. या शिवाय सात रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.
त्यामुळे आता एकूण 77 रुग्णांवर मेयो आणि मेडिकल या शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. बुधवारी नव्याने पुढे आलेल्या रुग्णांमध्ये सहा रुग्ण हे मध्य नागपुरातील गोळीबार चौक येथील रहिवासी आहेत. तर एक रुग्ण मोमीनपुरा या भागात राहणार आहे. शिवाय पाच रुग्ण हे एसआरपीएफचे जवान आहेत. या सर्वांना प्रशासनाने आधीच क्वारंटाईन केल्याची माहिती मिळत आहे.