महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

raksha bandhan 2022 कोल्हापुरात युवतीसेनेचा यंदाचा रक्षाबंधन कोरोना योध्यासोबत साजरा

बंडखोरीनंतर कोसळलेली शिवसेना आता सावरण्याचा प्रयत्न करत आहे. याच दरम्यान आज रक्षाबंधन सण आल्याने कोल्हापुरातील ( Raksha Bandhan Celebration In Kolhapur ) युवतीसेना आणि शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी हिंदुत्व जपत रक्षाबंधन सणाच्या माध्यमातून कोरोना काळात जीवाची काळजी नकरता कर्तव्य बजावलेले आरोग्यसेवक आणि पोलीस यांना राखी बांधत ( Tying rakhi to health workers and police ) हा सण साजरी केला आहे.

Rakshabandhan with Corona Yodhya
कोरोना योध्यासोबत रक्षाबंधन साजरा

By

Published : Aug 11, 2022, 10:18 AM IST

मुंबईबंडखोरी झाल्याने शिवसेनेमध्ये एका बाजूला भलीमोठी दरी निर्माण झालेली असताना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांना धीर देण्यासाठी आणि शिवसेनेतील पदाधिकारी आणि शिवसैनिक पुन्हा कामाला लागले आहेत. आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) आणि त्यांची युवासेना ही देखील शिवसेना मजबुतीच्या दिशेने काम करत आहे. याच दरम्यान आज रक्षाबंधन ( raksha bandhan 2022 ) सण आल्याने कोल्हापुरातील युवतीसेना आणि शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी हिंदुत्व जपत रक्षाबंधन सणाच्या माध्यमातून कोरोना काळात जीवाची काळजी नकरता कर्तव्य बजावलेले आरोग्यसेवक आणि पोलीस यांना राखी बांधत हा सण साजरी केला आहे ( Raksha Bandhan Celebration In Kolhapur ) .

फ्रंट वर्कर्सना राखी बांधत सन्मान कोरोना काळात सर्वच सण साजरी करण्यावर निर्बंध आणण्यात आले होते. मात्र यंदा निर्बंधमुक्त सण साजरी होत असताना शिवसेनेच्यावतीने कोल्हापुरात कोरोना काळात आपल्या जीवाची काळजी न करता सेवा वाजवणाऱ्या आरोग्य सेवक, पोलीस यांना राखी बांधत त्यांचा सन्मान करण्यात आला. बहीण भावाचे पवित्र नाते जपण्यात आले. यावेळी कोरोना काळात कोरोना सेंटर म्हणून असणारे आधार हॉस्पिटलमधील वार्ड बॉय, सेवा देणारे अधिकारी, आयसोलेशन हॉस्पिटलचे सेवा देणारे कर्मचारी, तसेच पोलीस बांधव यांचा राखी बांधून सन्मान करण्यात आला. यावेळी उपजिल्हा संघटिका शिवसेना महिला आघाडी स्मिता सावंत मांडरे, स्वरूपा खुरंदरे, नम्रता पाटिल, पूनम पाटिल युवतीसेना जिल्हा अधिकारी, श्वेता सुतार उपजिल्हा अधिकारी युवतीसेना, तेजस्वनि चौगुले, सानिका दामूकडे, सिद्धि दामूकडे, वैशनवी खुरंदरे, काजल कदम, माधुरी पाटिल, गीतांजली ठोंबे आदी उपस्थित होते.

हेही वाचाRaksha Bandhan 2022 मुंबई महापालिका विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त बनवल्या पर्यावरणपूरक राख्या

ABOUT THE AUTHOR

...view details