महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिंडोशीत राबवली जाते युवा सेनेकडून ऑक्सिजन बँकची अनोखी संकल्पना

कोविड रुग्णांसाठी वेळीच ऑक्सिजन उपलब्ध होणे गरजेचे आहे. वेळीच ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या माध्यमातून ऑक्सिजन बँकची अनोखी संकल्पना राबविण्याचा निर्धार केला आहे.

अनोखी संकल्पना
अनोखी संकल्पना

By

Published : May 23, 2021, 8:48 PM IST

मुंबई- कोविड रुग्णांसाठी वेळीच ऑक्सिजन उपलब्ध होणे गरजेचे आहे. ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या माध्यमातून ऑक्सिजन बँकची अनोखी संकल्पना राबविण्याचा निर्धार केला आहे. त्यांची ही संकल्पना दिंडोशी विधानसभा मतदार संघातील आठ प्रभागात युवासेनेच्या माध्यमातून राबवण्याचा निर्धार युवासेना कार्यकारिणी सदस्य आणि आमदार सुनील प्रभू यांनी केला आहे.

दिंडोशीत राबवली जाते युवा सेनेकडून ऑक्सिजन बँकची अनोखी संकल्पना

दिंडोशी विधानसभा व शुभारंभ फाऊंडेशनच्या वतीने या ऑक्सिजन बँक मोहिमेचा शुभारंभ नुकताच शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, स्थानिक आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभु यांच्या हस्ते करण्यात आला.

युवासेनेची 21 जणांची टीम

दिंडोधी विधानसभेतील प्रत्येक प्रभागात आम्ही ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन उपलब्ध करून दिले आहे. यासाठी युवासेनेची 21 जणांची टीम तैनात करण्यात आली आहे. डॉक्टर आणि नर्सच्या मार्गदर्शनाखाली गरजू कोविड रुग्णांनी येथील युवा सेनेच्या टीमशी संपर्क साधल्यावर त्यांना तत्काळ घरपोच 'ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन' उपलब्ध करून दिले जाईल. ही मशीन कशी ऑपरेट करायची याचे प्रात्यक्षिक दिले जाईल. कोविड रुग्णाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळाल्यावर त्यांच्या घरून 'ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन' घेऊन येतील. कोविड रुग्णांना वेळीच ऑक्सिजन मिळाल्याने रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्यांची खाली येणारी ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात राहील असा विश्वास आमदार सुनील प्रूभी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा- 'लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका'

ABOUT THE AUTHOR

...view details