महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 6, 2022, 7:06 AM IST

ETV Bharat / city

Youth died falling in mine: खदानीत पडून तरुणाचा मृत्यू, मुंबईतील दहिसर भागातील घटना

खदानात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची ( Youth died falling in mine in Dahisar ) घटना मुंबईतील दहिसर भागात घडली आहे. दोन तरुण रात्रीच्या वेळी फिरत होते. या दरम्यान पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे खदान असल्याचा अंदाज न आल्याने दोन्ही तरुण खदानीत पडले. यातील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

youth died falling in mine in dahisar
शोधकार्याचे दृश्य

मुंबई -दहिसर पू. येथील वैशाली नगरमधील सुहासिनी पावसकर ( Youth died falling in mine in Dahisar ) मार्गावर असलेल्या खदानात दोन तरुण पडले. ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. खदानीत पडलेल्या तरुणांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी फिरत असताना पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे खदान असल्याचा अंदाज न आल्याने दोन तरुण खदानीत पडले. त्यानंतर त्यातील एकाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. तरुणाचे नाव शेखर पप्पू विश्वकर्मा (वय १९) असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे.

तरुणांना शोधताना बचाव पथक

हेही वाचा -Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, 'बंडखोरांना पर्याय शोधण्याचे आदेश', लवकरच महाराष्ट्र दौरा

सखल भागांत पाणी साचले -मुंबई आणि महाराष्ट्राच्या ( Mumbai and Maharashtra ) काही भागांमध्ये पावसाने सोमवारपासून दमदार हजेरी लावली. मुंबईत सोमवारी पहाटेपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे सकाळी कार्यालयाला पोहचणार्‍या चाकरमान्यांना कसरत करावी लागली. मुंबईत अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने या भागांमधील वाहतूक मंदावली होती.

अंधेरी, सांताक्रुज, खारसह 'या' भागांमध्ये मुसळधार पाऊस -मुंबई, दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जगमेश्वरी, अंधेरी, खार, सांताक्रुज, विलेपार्ले, दादर, बांद्रामध्ये ( Heavy rains in Borivali Kandivali Malad Goregaon ) मुसळधार पाऊस कोसळला आहे. सर्वत्र पावसाचा जोर वाढत असताना राज्यासाठी ( Heavy rains in some parts of Mumbai ) पुढचे पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. पुढचे पाच महाराष्ट्र, मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून मुंबई उपनगर भागात ऑरेंज अलर्ट ( Heavy rains in Jagmeshwari Andheri ) जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात देखील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांना इशारा जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आज मराठवाड्यातील काही भागांत 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळ वारा व मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, मराठवाड्यात 6 व 7 जुलै रोजी देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढचे काही दिवस ऑरेंज अलर्ट -मुंबई आणि परिसरात सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचवेळी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येत्या २४ तासांत मुंबई आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पावसाळ्यात महाराष्ट्रासाठी 'ऑरेंज' आणि 'यलो' अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे, तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने वेगळ्या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या या अंदाजामुळे प्रशासनाकडून लोकांना योग्य खबरदारी घेण्यास आणि पाणवठ्यांजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा -या सर्वांबाबत हवामान विभागाचे अधिकारी जयंत सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जोराचे वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पुढचे काही दिवस पडेल. या मुसळधार पावसाचा फटका मुंबई तसेच उपनगरासह मुंबईच्या आजूबाजूच्या कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. तसेच याचा काहीसा परिणाम उर्वरित महाराष्ट्रात देखील थोड्या प्रमाणात दिसेल. त्यामुळे मुंबई हवामान विभागाकडून या परिसरात काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा." असं आवाहन जयंत सरकार यांनी केल आहे.

हेही वाचा -Aaditya Thackeray On Rebel MLA : कोणाच्या खास प्रेमाची गरज नाही, आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला ठणकावले

ABOUT THE AUTHOR

...view details