महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

युवक काँग्रेसचे 'उद्यासाठी आत्ता' अभियान, पाच कोटी युवकांशी साधणार संवाद

'उद्यासाठी आत्ता' यात्रेच्या माध्यमातून राज्यभरात येत्या ४५ दिवसांत कार्यक्रम राबविला जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून पाच कोटी तरुणांपर्यंत जाण्याचा मानस युवक काँग्रेसने केला आहे. त्यासाठी तालुका, जिल्हा स्तरावर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पोचणार आहेत.

युवक काँग्रेसचे 'उद्यासाठी आत्ता' अभियान, पाच कोटी युवकांशी साधणार संवाद

By

Published : Aug 2, 2019, 9:07 AM IST

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेकडून 'जन आशीर्वाद' आणि मुख्यंमत्री देवेद्र फडणवीस यांची 'महाजनादेश यात्रा' सुरू झाली आहे. या धरतीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनेही 'वेकअप महाराष्ट्र' 'उद्यासाठी आत्ता' चां नारा देत राज्यात युवकांसाठी संवाद यात्रेची घोषणा केली. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी याबाबतची माहिती दिली.

युवक काँग्रेसचे 'उद्यासाठी आत्ता' अभियान, पाच कोटी युवकांशी साधणार संवाद

'उद्यासाठी आत्ता' यात्रेच्या माध्यमातून राज्यभरात येत्या ४५ दिवसात कार्यक्रम राबविला जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून पाच कोटी तरुणांपर्यंत जाण्याचा मानस युवक काँग्रेसने केला आहे. त्यासाठी तालुका, जिल्हा स्तरावर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पोहोचणार आहेत. या माध्यमातून देशात पहिल्यांदा युवकांचा जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. हा जाहीरनामा आणि युवकांचे प्रश्न घेऊन काँग्रेस विधानसभेच्या निवडणुकीत आपला अजेंडा चालवणार आहे.

उद्यासाठी आत्ता असे अभियानाचे नाव आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 18 ते 30 वर्षे या वयोगटातील सुमारे 5 कोटी तरुणांना सामील करून घेऊन त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांचे प्रश्न काय आहे हे समोर आणून त्या मांडल्या जाणार आहेत. हे अभियान ऑनलाईन आणि ऑफलाईन चालवण्यात येणार आहे.

या अभियानाच्या माध्यमातून पाणी, शेती, भविष्यातील इंधन, वीज आदी प्रश्न आहेत त्यावर तरुणांना प्रश्न विचारून त्यावर त्यांची मते मागवली जाणार आहेत. नवीन रोजगार, क्रीडा या क्षेत्रासाठी काय परिस्थिती आहे, त्यासाठी काय पर्याय आहेत आदी माहिती यात घेतली जाणार आहे. राज्याचा विकास होण्यासाठी महिला सुरक्षा, शिक्षण, रोजगार आदींवर येणाऱ्या सरकारला प्रश्न विचारले जाणार आहेत, अशी माहिती यावेळी तांबे यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यात्रा काढत असून त्यांनी मोझरी येथील संत तुकडोजी महाराज यांनी सर्वधर्म समभाव मांडला याचा विचार मुख्यमंत्री यांनी पाळावा. देशात जातीत धर्मात तेढ निर्माण होत आहे. मुस्लीम समाजाच्या तरुणाने झोमॅटोची ऑर्डर आणली ती नाकारली जात आहे. यावरून जातीचा तेढ वाढत आहे हे कळते. या पार्श्वभूमीवर आमचा हे अभियान तरुण, युवकांसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे तांबे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details