महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महाराष्ट्रातच मराठी चित्रपटाला थिएटर मिळवण्यासाठी भीक मागावी लागते; सुबोध भावेंची खंत - अभिनेता सुबोध भावेला उद्योगरत्न पुरस्कार

जागतिक मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजतर्फे उद्योग क्षेत्रात उतुंग भरारी घेत असलेल्या उद्योजकांना उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आला. अभिनेता सुबोध भावे यांनाही उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

World Marathi Chambers of Commerce Industries
जागतिक मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजतर्फे उद्योजकांना उद्योगरत्न पुरस्कार

By

Published : Jan 8, 2020, 10:30 PM IST

मुंबई -भारतीय चित्रपट सृष्टीची निर्मिती एका मराठी माणसाने केली, मात्र आज महाराष्ट्रातच मराठी चित्रपटाला थिएटर मिळवण्यासाठी भीक मागावी लागते, अशी खंत अभिनेता, निर्माता सुबोध भावे यांनी व्यक्त केली. जागतिक मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजतर्फे उद्योग क्षेत्रात उतुंग भरारी घेत असलेल्या उद्योजकांना उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात झालेल्या या सोहळ्यात, अभिनेता सुबोध भावे यांनाही उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जागतिक मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजतर्फे उद्योग क्षेत्रात उतुंग भरारी घेत असलेल्या उद्योजकांना उद्योगरत्न पुरस्कार...

हेही वाचा... 'दीपिका पदूकोण ही तुकडे-तुकडे गँगची सदस्य'

महाराष्ट्रात एकही मराठी निर्मात्यांचा स्वतःचा स्टुडिओ नाही. तेच दक्षिणेतील निर्मात्यांनी सर्व यंत्रणा उभारल्याचे पाहायला मिळते. एका स्टुडिओतून अनेक रोजगार संधी निर्माण होतात. उद्योग क्षेत्रात मान्यता नसलेल्या फिल्म इंडस्ट्रीतील एका घटकाचा आज सन्मान करण्यात आला. त्यामुळे मी संपूर्ण चित्रपट सृष्टीच्या वतीने हा पुरस्कार पुरस्कार स्वीकारतो, अशी प्रतिक्रिया सुबोध भावे यांनी दिली.

हेही वाचा... उद्योगस्नेही वातावरण तयार करण्याचे 'मुख्यमंत्र्यांकडून उद्योगपतींना आश्वासन'

इतर उद्योगांच्या तुलनेत कुठलेही फायदे नाट्य सृष्टीला मिळत नाही. सोईसुविधा उपलब्ध होत नाहीत. उद्योजक इंडस्ट्रीची मान्यता न मिळालेल्या घटकाचा सन्मान केल्याबद्दल सुबोध भावेंनी आभार व्यक्त केले. तसेच फिल्म जगताला इंडस्ट्री म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी देखील भावे यांनी केली.

हेही वाचा... लेकीला लक्ष्मी मानणाऱ्या 'त्या' पित्याने जिंकले अशोक चव्हाणांचे मन.. फोन करून केली विचारपूस !

यावर्षी उद्योगरत्न पुरस्काराने बडवे ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे, श्रीनिवास इंजिनिअरींग ऑटो कॉम्पोनेटसचे प्रा. लि. जी. एस. काळे, संस्थापक आणि संचालक अब्दुला अँड असोसिएटेट, दुबई, यू.ए.ई. अशोक वर्तक, अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते सुबोध भावे तसेच प्रो. अनंत एन्टरप्रायझेस शिला धारिया यांना सन्मानित करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details