मुंबई -शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका ऑर्केस्ट्रा सिंगर महिलेला अटक केली आहे. ही महिला मुंबईत चोरी करण्यासाठी विमानाने प्रवास करायची. मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून दादर, लोअर परळ परिसर व इतर ठिकाणी असलेल्या मॉल्समध्ये महिलांच्या पर्स चोरी होत असल्याच्या घटना घडत होत्या.
या संदर्भात मागील काही महिन्यांपासून मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा तपास करत होती. काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजचा तपास केल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आले, की संबंधित चोरी करणारी महिला ही एकच असून तिच्याबद्दलचा ठावठिकाणा काढण्याचे काम मुंबई पोलिसांनी केले. पोलिसांना मिळालेल्या तांत्रिक तपासाच्या माहितीवरून बेंगलोर परिसरातून अर्चना बरुआ उर्फ मूनमून हुसेन या महिलेला ताब्यात घेण्यात आले.
विमानाने मुंबईत येऊन चोरी करणाऱ्या महिलेला अटक - criminal woman arrested in mumbai
शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका ऑर्केस्ट्रा सिंगर महिलेला अटक केली आहे. ही महिला मुंबईत चोरी करण्यासाठी विमानाने प्रवास करायची. मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून दादर, लोअर परळ परिसर व इतर ठिकाणी असलेल्या मॉल्समध्ये महिलांच्या पर्स चोरी होत असल्याच्या घटना घडत होत्या.
विमानाने मुंबईत येऊन चोरी करणाऱ्या महिलेला अटक
विविध शहरांत शहरात चोरी करण्यासाठी करायची विमानाने प्रवास
अटक करण्यात आलेली आरोपी महिला अर्चना बरुआ ही पेशाने ऑर्केस्ट्रा सिंगर असून मुंबईसह देशभरातील शहरांमध्ये जाऊन तिने अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याची कबूली दिली आहे. या महिलेकडून काही प्रमाणात मुद्देमाल सुद्धा पोलिसांनी हस्तगत केला आहे. देशभरातील शहरांमध्ये चोरी करण्यासाठी ही महिला आरोपी विमानाने प्रवास करत असल्याचं समोर आलंय.