मुंबई -कोरोनाबाधित असलेल्या पतीच्या निधनानंतर हताश झालेल्या पत्नीने तिच्या 7 वर्षांच्या मुलासह इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना अंधेरी पूर्व परिसरामध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरातील चांदिवली येथे असलेल्या तुलिपिया इमारतीत रेश्मा ट्रेनशील या महिलेच्या 49 वर्षीय पतीचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाले होते. यानंतर मानसिक तणावाखाली असलेल्या या महिलेने तिच्या 7 वर्षाच्या मुलाला सोबतघेऊन इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी काही दिवसाअगोदर रेश्मा यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट लिहिली होती. यात पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारच्या अडचणी येत आहेत आणि त्यांच्या जीवनाला कशाप्रकारे एक वेगळे रूप मिळाले असल्याचे त्यांनी लिहिलेले होत. सध्याचा काळ हा तिच्यासाठी खूपच कठीण असूनअडचणीत वाढ होत असल्याचे त्यांनी म्हटले होत. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने कुठल्याही प्रकारचे सुसाइड नोट सोडली नाही. यासंदर्भात पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
Corona Impact : मुंबईत सात वर्षाच्या मुलासह महिलेने केली आत्महत्या
मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरातील चांदिवली येथे असलेल्या तुलिपिया इमारतीत रेश्मा ट्रेनशील या महिलेच्या 49 वर्षीय पतीचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाले होते. यानंतर मानसिक तणावाखाली असलेल्या या महिलेने तिच्या 7 वर्षाच्या मुलाला सोबतघेऊन इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे.
मुलासह महिलेने केली आत्महत्या