मुंबई -घराबाहेर खेळणाऱ्या एका १० वर्षांच्या मुलाला शेजाऱ्याने मारल्याचा जाब विचारला असता २ कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. हा वाद विकोपाला जाऊन मुलाच्या आईवर एका तरुणाने चाकूने वार करून जखमी केले आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी दोन पुरुषांसहित दोन महिलांना अटक केली.
खारघर नवी मुंबई येथील रहिवासी पूनम टाक या आपल्या 10 वर्षाच्या मुलासह मानखुर्द येथे नातेवाईकाकडे आल्या होत्या. पूनम टाक यांचा मुलगा घराबाहेर खेळत होता. यावेळी शेजारी राहणाऱ्या अमित कजानिया याने मुलाला मारल्याने तो रडत घरी आला. यावेळी पूनम यांनी का मारले विचारायला गेले असता दोन कुटुंबात जोरदार भांडण सुरू झाले.