मुंबई- विद्याविहार पश्चिम येथील डिमार्टच्या बाजूला पदपथावर महिलेचा शीर आणि पाय कापलेला मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी घाटकोपर पोलीस आणि गुन्हे शाखा दाखल झाली आहे.
विद्याविहारमध्ये आढळला महिलेचा धडापासून शीर व पाय कापलेला मृतदेह - vidyavihar police
विद्याविहार पश्चिम येथील डिमार्टच्या बाजूला पदपथावर महिलेचा शीर आणि पाय कापलेला मृतदेह आढळून आला आहे.
विद्याविहारमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
हेही वाचा -ठरलं..! आदित्य ठाकरे घेणार मंत्रिपदाची शपथ
सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास काही पादचाऱ्यांना हा मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. मृतदेहाला शीर नसल्याने त्याची अजून ओळख पटली नाही. गेल्या काही दिवसात मुंबईत अशा प्रकारच्या हत्या करून शरीराचे भाग कापून मृतदेह फेकण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.
Last Updated : Dec 30, 2019, 1:44 PM IST