मुंबई- महिलांवर होणाऱ्या आत्याचाराच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाल्याचे चित्र आहे. यातच आता खार येथे एका महिलेला भर रस्त्यात मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिला एका स्वयंसेवी संस्थेत काम करते. अस्लम शेख असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सहा फेब्रुवारीला हा प्रकार घडला असून सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
VIDEO : भररस्त्यात महिलेला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद - mumbai woman harassment news
खार येथे एका महिलेला भर रस्त्यात मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिला एका स्वयंसेवी संस्थेत काम करते.
खार येथे एका महिलेला भर रस्त्यात मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
29 जानेवारीला अस्लम शेखच्या घराबाहेर स्वयंसेवी संस्थेचा पाण्याचा टँकर उभा होता. यावरून त्याचे पीडित महिलेसोबत भांडण झाले. नंतर या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याचाच राग मनात धरून अस्लम शेखने सहा फेब्रुवारीला संस्थेच्या कार्यालयासमोर जाऊन वाद घालण्यास सुरुवात केली. हा विषय वाढत गेला. शेखने या महिलेला रस्त्यावर खेचून मारहाण केली. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.