महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सुनावणीला काही तास शिल्लक असताना शाहरुख खानने आर्यनचा वकील बदलला - etv bharat

मुलगा आर्यन खानच्या क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणातील जामीन अर्जावर आज बुधवारी सत्र न्यायालयात सुनावणी आहे. फक्त सुनावणीला काही तास शिल्लक असतानाच आर्यन खानचे वकील बदलण्याचा निर्णय किंग खानने घेतला आहे. त्यामुळे आता जेष्ठ वकील सतीश मानेशिंदें एवजी जेष्ठ वकील अमित देसाई आर्यन खान जामीन प्रकरणात बाजू मांडणार आहेत. दरम्यान, अचानक वकील बदलल्याने आता अमित देसाईंच्या आजच्या युक्तीवादाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आर्यन खान
आर्यन खान

By

Published : Oct 13, 2021, 2:26 PM IST

मुंबई - शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणातील जामीन अर्जावर आज बुधवारी सत्र न्यायालयात सुनावणी आहे. फक्त सुनावणीला काही तास शिल्लक असतानाच आर्यन खानचे वकील बदलण्याचा निर्णय किंग खानने घेतला आहे. त्यामुळे आता जेष्ठ वकील सतीश मानेशिंदें एवजी जेष्ठ वकील अमित देसाई आर्यन खान जामीन प्रकरणात बाजू मांडणार आहेत. बॉलिवुडचा भाईजान सलमान खानचे आणि अमित देसाईंचे एक कनेक्शन आहे. आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केल्यानंतर किंग खानच्या घरी आलेली पहिली व्यक्ती म्हणजे सलमान खान होती. त्यामुळेच सलमानच्या सल्ल्यावरून तर किंग खानने वकील बदलला नाही ना? या तर्कवितर्कांना आधा उधाण आले आहे.

अमित देसाईंच्या आजच्या युक्तीवादाकडे सगळ्यांचे लक्ष लागले

बॉलिवुडचा भाईजान म्हणजे सलमान खानला (२००२)च्या हिट एण्ड रन प्रकरणात न्याय मिळवून देण्यात अमित देसाईंची भूमिका खूप मोलाची ठरली होती. कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. पण या शिक्षेला आव्हान देत अमित देसाईंनी सलमानला यशस्वीपणे जामीन मिळवून दिला. २०१५ साली या प्रकरणी सलमानला ३० हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला होता. तपास यंत्रणांना पुरावे सादर करण्यात आलेल्या अपयशामुळेच या प्रकरणात १० डिसेंबर २०१५ रोजी सलमान निर्दोष सुटला. त्यामुळेच सलमानच्या मदतीला धावणाऱ्या अमित देसाई यांच्या मदतीचा सल्ला कदाचित सलमान खानने शाहरूखला दिला असावा, अशी चर्चा आहे. आर्यनचा एन सुनावणी आधी वकील बदलल्याने आता अमित देसाईंच्या आजच्या युक्तीवादाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा -ड्रग्स पार्टी प्रकरण : आर्यन खानला जेल की बेल; जामीन अर्जावर दुपारी सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details