मुंबई - राज ठाकरे यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांचे अटकसत्र सुरू केले. पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले असताना मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कारचा धक्का लागल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. या प्रकरणी देशपांडेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याविरोधात सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर आज सुनावणी झाली. आता यावर कोर्ट १९ तारखेला निकाल देणार आहे.
राज ठाकरेंचा पाळत होते आदेश - राज ठाकरे यांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश दिले होते. मनसैनिकांनी 4 मे रोजी ठिकठिकाणी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यभरात पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
अनेक कलमांखाली खटला - मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी गेले असताना देशपांडे आणि संतोष वाहनातून पळून गेले. कार भरधाव वेगात दामटल्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्याला धडक बसली आणि त्या जागेवरच कोसळल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी देशपांडेसह त्यांचा ड्रायव्हर, शाखाध्यक्ष संतोष साळी आणि संतोष धुरीविरोधात कलम 308, 353, 279 आणि 336 अन्वये गुन्हा दाखल केला.
अटकेची शक्यता - अटकेची टांगती तलवार निर्माण झाल्याने दोघांनीही सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, मागील मंगळवारी न्यायालयाचे न्यायधीश उपस्थित नसल्यामुळे सुनावणी 17 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली. तोपर्यंत देशपांडे आणि धुरी यांना अटकेपासून कोणतेही संरक्षण देण्यात न आल्यामुळे देशपांडेच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून सध्या देशपांडे आणि धुरी भूमीगत आहेत.
आज सुनावणीची उत्सुकता - या प्रकरणी मुंबई पोलिसांनी संदीप देशपांडेचा ड्रायव्हर रोहित वैश्य आणि शाखाध्यक्ष संतोष साळी यांना शिवाजीपार्क पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे दोघांनीही सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर न्या. पी. बी. जाधव यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना जामीन अर्जावर १९ तारखेला येणार निकाल - Will Sandeep Deshpande and Santosh Dhuri get bail
कारचा धक्का लागल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. या प्रकरणी देशपांडेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याविरोधात सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर आज सुनावणी झाली. आता यावर कोर्ट १९ तारखेला निकाल देणार आहे.
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना जामीन की अटक
Last Updated : May 17, 2022, 1:51 PM IST