महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आज कृषी दिन...! महाराष्ट्रात 1 जुलैला का साजरा केला जातो हा दिवस

महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असल्याने कृषी दिनाचे खुप महत्व आहे. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने 1 जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

कृषी दिन
कृषी दिन

By

Published : Jul 1, 2021, 7:33 AM IST

मुंबई - महाराष्ट्र शासनाने कृषी दिन हा 1 जूलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असल्याने कृषी दिनाचे खुप महत्व आहे. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो.

कृषी क्रांतीचे प्रणेते -

कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने 1 जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. हरित क्रांतीचे प्रणेते अशी वसंतराव नाईक यांची ओळख होती. कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे त्यांनी लक्ष दिले. दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी 1965 मध्ये निक्षून सांगितले.

कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत असत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय वसंतरावांकडेच जाते. तसेच वसंतराव नाईक यांनी राज्यात कृषी विद्यापीठांची स्थापना केली. त्यांच्या पश्चात परभणी येथील कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईक विद्यापीठ हे नाव देण्यात आले.

वसंतराव नाईक यांनी कृषी विषयक अभ्यासासाठी चीन, जपान, सिंगापूर, श्रीलंका आदी देशात दौरे केले. तेथील वेगवेगळ्या शेतीपिकांच्या संकरीत वाणांचा अभ्यास केला आणि तेथील शेती वाणांची ओळख महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना करून दिली. देशात पहिल्यांदाच रोजगार हमी योजना महाराष्ट्रात राबविण्याचे धाडस त्यांनी केले. आपल्या सत्ताविस वर्षाच्या कार्यकाळात शेती विषयक अनेक महत्वपूर्ण योजना राबविल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details