महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Biography of Cyrus Mistry उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे उद्योगविश्वात काय राहिले योगदान, वाचा त्यांची आजवरची वाटचाल

उद्योजक (Creative Industrialist) आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष (Former Chairman of Tata Group) सायरस मिस्त्री यांचं निधन (Cyrus Mistry Death) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा अपघात झाला असून त्यात त्यांचा मृत्यू झाला. सर्जनशील उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं उद्योगविश्वातील (Contribution To World Of Industries ) योगदान जाणून घेऊ या.

By

Published : Sep 4, 2022, 6:41 PM IST

Cyrus Mistry
सायरस मिस्त्री

मुंबईउद्योजक (Creative Industrialist) आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष (Former Chairman of Tata Group) सायरस मिस्त्री यांचं निधन (Cyrus Mistry Death) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा अपघात झाला असून त्यात त्यांचा मृत्यू झाला. सर्जनशील उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं उद्योगविश्वातील (Contribution To World Of Industries ) योगदान जाणून घेऊ या.

कौटूंबिक पार्श्वभुमीसायरस मिस्त्री हे पालोनजी मिस्त्री (Pallonji Mistry) यांचे सुपुत्र होते. मिस्त्री हे मुंबईतील पारशी समाजाचे (Parsi community)सदस्य होते. पारसी अगदी सुरुवातीच्या वसाहत काळापासून व्यापारी आणि उद्योगपती म्हणून समृद्ध झाले होते. याचं समाजातील कुमार मंगलम बिर्ला, टाटा, धीरूभाई अंबानी अशी सगळी ज्येष्ठ वयाची उद्योगपती मंडळी आहे. तुलनेने सायरस मिस्त्री हे त्यांच्यापेक्षा कमी वयाचे आणि भारत आणि भारताबाहेर बांधकाम उद्योग विस्तारणारे यशस्वी उद्योजक (entrepreneur expanding construction industry) म्हणून ओळखले जायचे.

शिक्षण लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी आपलं शिक्षण घेतलं. त्यानंतर इंपीरिअल कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली. लंडन येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी आणि लंडन बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

उद्योगविश्वातील योगदान1991 मध्ये सायरस यांनी कौटुंबिक व्यवसायात प्रवेश केला. शापूरजी पालोनजी अँड कंपनी लिमिटेड या प्रमुख बांधकाम कंपनीचे संचालक झाले. त्यांचा भाऊ शापूर यांनी समूहाच्या रिअल इस्टेट व्यवसायात वाढ केली. वडील संचालक मंडळाचे अध्यक्ष राहिले. २००६ मध्ये सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे (Tata Group) सदस्य बनले. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांच्याकडे टाटा समुहाच्या अध्यक्षपदाची धुरा (Chairmanship of the Tata Group) सोपवण्यात आली. परंतु २०१६ मध्ये झालेल्या वादानंतर त्यांना या पदावरून हटवण्यात आलं. याशिवाय सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टरही होती. सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील १८.५ टक्के हिस्सा विकत घेतला होता. पारंपारिक बांधकामाच्या पलीकडे मोठ्या अभियांत्रिकी प्रकल्पांपर्यत सायरस यांनी मजल मारली. परदेशातही व्यवसाय विस्तारला.

टाटा समूह वादटाटा समूहामध्ये रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यामध्ये वाद (Controversy between Ratan Tata Cyrus Mistry) निर्माण झाल्यामुळे सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून पदावरून काढण्यात आला होतं. मात्र, तरीही त्यांनी आपल्या स्वतःच्या उद्योगावर लक्ष केंद्रित करून यश संपादन केलं. विविध देशांमध्ये त्यांचा बांधकाम, ऊर्जा, अभियांत्रिकी उद्योग विस्तारला. अत्यंत कमी वयात आंतरराष्ट्रीय उद्योग जगतात सायरस मिस्त्री दखलपात्र ठरले. आज सायरस मिस्त्री (cyrus mistry) यांचा अपघाती मृत्यू (Accidental death) झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details