मुंबई -अंबानी स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर एनआयएच्या हाती लागलेल्या माहितीनंतर अनेक खळबळजनक गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात विरोधी पक्षाने शिवसेनेला घेरण्याची जोरदार तयारी केली आहे. आज आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत युवा नेते वरूण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्या संबंधावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपामुळे वरूण सरदेसाई पुन्हा चर्चेत आले आहेत.
हेही वाचा -इनोव्हाची नंबरप्लेट बदलली? पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडताना सीसीटीव्हीत कैद
नितेश राणे यांनी वरूण सरदेसाई यांच्यावर केलेले आरोप
वाझेंनी सट्टेबाजांना पैशासाठी फोन केल्यानंतर वाझेंना वरुण सरदेसाईंचा फोन जात होता. वाझे आणि सरदेसाई यांच्यातल्या संभाषणाची चौकशी करण्यात यावी, या संभाषणाचा सीडीआर काढण्यात यावा, त्यात काय काय बोलणं झालं याची माहिती घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सरदेसाई कुणाचे नातेवाईक आहेत आणि कुणाच्या आशीर्वादाने हे फोन केले जात होते हे सांगण्याची गरज नाही, असे आरोप राणे यांनी वरूण सरदेसाई यांच्यावर केले आहेत.
कोण आहेत वरुण सरदेसाई?