महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोण आहेत दबंग अधिकारी समीर वानखेडे? जाणून घ्या ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट

शनिवार (दि. 2 ऑक्टोबर)रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अरबी समुद्रातील हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीवर एनसीबीने कारवाई केली. यामध्ये अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे. मात्र, या प्रकरणानंतर राज्यासह देशभर एक नाव चर्चेत आले आहे ते समीर वानखेडे यांचे. कित्येकांना प्रश्न पडलाय कोण आहेत समीर वानखेडे? तर, जाणून घ्या त्यांच्याविषयी ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट-

पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर अधिकारी समीर वानखेडे
पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर अधिकारी समीर वानखेडे

By

Published : Oct 12, 2021, 12:59 PM IST

मुंबई -अरबी समुद्रातील हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीवर शनिवार (दि. 2 ऑक्टोबर)रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एनसीबीने कारवाई केली. यामध्ये अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली. हे प्रकरण आणखीही सुरूच आहे. मात्र, या प्रकरणानंतर राज्यासह देशभर एक नाव चर्चेत आले आहे ते समीर वानखेडे यांचे. कित्येकांना प्रश्न पडलाय कोण आहेत समीर वानखेडे? जाणून घ्या त्यांच्याविषयी ईटीव्ही भारत'कडील खास माहिती-

गेल्या दोन वर्षांत त्यांच्या नेतृत्वात एनसीबीने १७ हजार कोटींपेक्षा जास्त ड्रग्ज पकडले

समीर वानखेडे हे (२००८)च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. महसूल सेवेत येण्याआधी (2006)ला ते केंद्र सरकारच्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये (Central Police Organization) रूजू झाले होते. ज्यामध्ये CPO मध्ये गुप्तचर विभाग, सीबीआय (CBI), नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो (NCRB), नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), नॅशलन इनव्हेस्टिगेटिंग एजन्सी (NIA) यांसारखे विविध विभाग येतात. वानखेडे यांची पहिली पोस्टिंग मुंबई विमानतळावर डिप्टी कस्टम कमिश्नर म्हणून झाली. त्यानंतर कस्टममधून त्यांची बदली नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनबीसी)मध्ये झाली. त्यानंतर (2020)मध्ये समीर वानखेडे यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो मुंबई विभागीय संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या नेतृत्वात एनसीबीने १७ हजार कोटींपेक्षा जास्त ड्रग्ज पकडले आहे.

या अगोदरही मोठ्या कारवाया

सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये अंमली पदार्थांसंदर्भातील खुलासा समोर आल्यानंतर या प्रकरणाचा तपासही समीर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, (2013)मध्ये वानखेडेंनी गायक मिका सिंगला परदेशी चलनासह मुंबई विमानतळावर पकडले होते. अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय आणि राम गोपाल वर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालमत्तांवर त्यांनी छापे टाकले आहेत. (2011)मध्ये, सोन्याने बनवलेल्या क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीला देखील कस्टम ड्यूटी भरल्यानंतरच मुंबई विमानतळावरून बाहेर पडण्याची परवानगी दिली होती.

सध्या समीर हे एनसीबी टीमचा एक भाग आहेत

एनसीबीच्या चौकशीत आयपीएस समीर वानखेडे चौकशी करत असल्यामुळे सबंध बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण आहे. बॉलिवूडमधील जे कलाकार ड्रग्ज घेतात, तसेच मादक पदार्थांची खरेदी-विक्री करतात ते चांगलेच घाबरलेत अशी चर्चा आहे. डीआरआयमध्ये असलेले समीर वानखेडे यांना गेल्या वर्षी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये पाठवण्यात आले आहे. सध्या समीर हे एनसीबी टीमचा एक भाग आहेत, जे सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगलचाही तपास करत आहे.

समीर वानखेडे अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती

समीर वानखेडे हे मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. समीर वानखेडे यांनी (2017)साली मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी विवाह केला. त्यांना जुळी मुले आहेत. या कारवाईनंतर चर्चेत आलेले पती समीर वानखेडे यांच्याबद्दल क्रांतीने त्यांचे कौतूक केले आहे. ‘एक पत्नी म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. ते फार मेहनती आहेत. हे प्रकरण बॉलिवूडमधील असल्याने त्याची जास्त चर्चा आहे. मात्र, त्यांनी या अगोदरही असे अनेक प्रकरणं हाताळली आहेत अस क्रांती म्हणाली आहे.

हेही वाचा -मुंबई पोलीस पाठलाग करत असल्याची समीर वानखेडेंची तक्रार

ABOUT THE AUTHOR

...view details