महाराष्ट्र

maharashtra

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारे एकनाथ शिंदे आणि 'ते' आमदार कोण? जाणून घ्या..

By

Published : Jun 21, 2022, 12:36 PM IST

Updated : Jun 21, 2022, 2:14 PM IST

एकनाथ शिंदे हे आपल्या काही समर्थकांबरोबर महाराष्ट्राबाहेर गुजरात ( who is shivsena leader eknath shinde ) येथील सुरतमध्ये एका हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे काही नेते नॉट रिचेबल दाखवत आहे. यामुळे एकनाथ शिंदे ( eknath shinde shivsena ) शिवसेनेशी नाराज आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या मोठी असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेत मोठे ( eknath shinde supporters ) वजन आहे. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुले त्यांच्या या पावलाने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहेत. राज्याच्या राजकारणात भूकंप आणणारे हे एकनाथ शिंदे आहेत तरी कोण? जाणून घेऊया.

who is shivsena leader eknath shinde
एकनाथ शिंदे

मुंबई -काल विधानपरिषदेच्या निवडणुकीत चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत फोडाफोडीची ( who is shivsena leader eknath shinde ) शक्यता व्यक्त होत होती. आणि तसे झाल्याचेही बोलल्या जात आहे. याचा फायदा भाजपला झाल्याची चर्चा आहे. काल झालेल्या या निवडणुकीनंतर शिवसेनेतील काही नेते नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर आज शिवसेनेचे वरिष्ट नेते व मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या काही समर्थकांबरोबर महाराष्ट्राबाहेर गुजरात येथील सुरतमध्ये एका हॉटेलमध्ये ( eknath shinde shivsena ) असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे काही नेते नॉट रिचेबल दाखवत आहे. यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेशी नाराज आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या मोठी असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेत मोठे वजन आहे. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुले त्यांच्या या पावलाने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहेत. राज्याच्या ( eknath shinde supporters ) राजकारणात भूकंप आणणारे हे एकनाथ शिंदे आहेत तरी कोण आहेत? त्याचबरोबर त्यांच्या समर्थकांबाबत जाणून घेऊया.

रिक्षाचालक ते गटनेते...असा आहे एकनाथ शिंदेंचा राजकीय प्रवास!

- शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाची माळ ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. यानंतर एकनाथ शिंदे यांचे पक्षातील वजन वाढले. रिक्षाचालक ते शिवसेना गटनेते असा एकनाथ शिंदेचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. आनंद दिघे यांच्या अपघाती मृत्यूनंतर जिल्ह्यात शिवसेना संपल्याचे चित्र असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख या नात्याने शिवसेना एकसंध ठेऊन मजबूत केली. यामुळे 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची प्रथमच एकहाती सत्ता आली. तसेच, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद, बदलापूर नगरपरिषद अशा सर्व ठिकाणी शिवसेनेला सत्ता मिळवण्यात हातभार लागला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यामुळे प्रभावित होऊन 1980 च्या दशकात शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात एकनाथ शिंदे हे रिक्षा चालवून उदरर्निवाह करत होते. 1984 साली किसननगर येथे शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. सीमा आंदोलनात तुरुंगवास झाला. 1997 मध्ये पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड झाली. 2001 मध्ये सभागृहनेतेपदी निवड झाली होती. सलग तीन वर्षे पद सांभाळले. 2004 मध्ये तत्कालीन ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. 2005 साली शिवसेनेचे ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाली. 2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा आमदार झाले. 2014 साली विधानसभेसाठी विजयाची हॅटट्रिक केली. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. डिसेंबर 2014 मध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. एमएसआरडीसीचे मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. जानेवारी 2019 मध्ये आरोग्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडली.

एकनाथ शिंदे समर्थक -

  • संजय राठोड -संजय राठोड हे शिवसेनेचे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघाचे आमदार आहेत. राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री होते. मात्र, टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पूजाच्या आत्महत्येनंतर माध्यमांत फोन वरील संभाषणाच्या काही ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्या. त्यातील आवाज हा पूजा आणि संजय राठोड यांचा असल्याचे बोलले गेले. यातील एका ऑडिओ क्लिपमुळे 'गबरुशेठ' हे नाव चर्चेत आले. पूजा चव्हाण हिची आत्महत्या नसून संजय राठोड यांनीच हत्या घडवली असल्याचा आरोप सातत्याने भाजपकडून करण्यात आला होता. सरकारवर याबाबतीत वाढत्या दबावामुळे शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राठोडांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा लागला होता. पण, पूजा चव्हाण यांच्या बाबतीत संजय राठोड यांच्यावर लावलेले आरोप अद्यापही सिद्ध झालेले ( Sanjay Rathod Puja Chavan Case ) नाहीत.
  • अब्दुल सत्तार - अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार आहेत. ते महाविकास आघाडीमध्ये राज्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्र्यांचे जवळचे मानले जातात. नुकतेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी साकडे घातले होते. त्यावर सत्तार यांनी त्यांना टोला हाणाल होता. राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदासाठी सुप्रिया सुळे ( Abdul Sattar comment on Supriya Sule over cm post ) असतील तर आमच्याकडे रश्मी ठाकरे आहेत, असे वक्तव्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. महिला मुख्यमंत्रीबाबत ( Rashmi Thackeray cm option abdul Sattar ) बोलताना त्यांनी हा पर्याय सांगितला होता.
  • शंभुराज देसाई -शंभुराज देसाई हे शिवसेनेचे सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघाचे आमदार आहेत. देसाई हे आघाडी सरकामध्ये गृहराज्यमंत्री आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. देसाई यांच्यावर अकार्यक्षमतेचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी लगावला होता.
  • महेंद्र दळवी - दळवी हे शिवसेनेचे अलिबाग मतदासंघाचे आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून त्यांचा विजय झाला होता. त्यांनी शेकापच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत अलिबागवर पहिल्यांदाच भगवा फडकवला. महेंद्र दळवी यांना 111047 मते मिळवली होती, तर शेकापचे विद्यमान आमदार सुभाष (पंडित) पाटील यांना 78086 मते मिळाली असून, त्यांचा 32611 मताने पराभव केला होता. काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र ठाकूर यांना 11853 तर काँग्रेसच्या श्रद्धा ठाकूर यांना फक्त 2511 मते मिळाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी महेंद्र दळवी विजयी झाल्याचे घोषित केले होते. महेंद्र दळवी यांच्या विजयानंतर अलिबाग तालुका हा भगवामय झाला.
  • विश्वनाथ भोईर - विश्वनाथ भोईर हे शिवसनेचे कल्याण पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकिटीवरून ते या मतदारसंघातून उभे राहिले होते. कल्याण पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे विश्वनाथ भोईर २२२७७ मतांनी विजयी झाले होते. त्यांनी अपक्ष उमेदवार नरेंद्र पवार यांचा पराभव केला होता. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा हा एक भाग आहे. कल्याण पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ ठाणे जिल्ह्याचा एक भाग आहे. याच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे आहेत आणि ते सध्या शिवसेनेच्या काही आमदारांसोबत गुजरातच्या सुरत येथील एका हॉटेलात वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते.
  • शहाजी बापू पाटील - शहाजी बापू पाटील हे सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. उजणीच्या पाणीप्रश्नावरून शहाजी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
  • संदिपान भुमरे - संदीपान भुमरे हे शिवसेनेचे पैठण मतदारसंघाचे आमदार आहेत. संदीपान भुमरे शिवसेनेकडून पाच वेळा आमदार झाले आहेत. भुमरे यांना कट्टर शिवसैनिक मानल्या जाते. भुमरे हे फलोत्पादन मंत्री आहेत. ते यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. राज्याचे रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांच्या मुलाने शासकीय जमिनीवर घरकुल योजनेसाठी बेकायदा भूखंड लाटत तीस कोटींची फसवणूक केल्याचा आरोप पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय गोर्डे यांनी केला होता.
  • उदयसिंह राजपूत - राजपूत हे शिवसेनेचे कन्नड मतदारसंघाचे आमदार आहेत. राजपूत यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून भीक मांगो आंदोलन करण्यात आले होते. मुंबईत आमदारांना घर देण्याच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले होते. कन्नड तालुक्याचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत (MLA Udaysingh Rajput) यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून भीक मागो आंदोलन करण्यात आले होते. विधानसभेत राजपूत यांनी आमदारांना घर देण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदारांना घर देण्यासाठी घोषणा केली. मात्र, त्यावेळी विधानसभेत शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांनी मुंबईत घर देण्याची मागणी केली. एकीकेडे कन्नड तालुक्यात अनेक नागरिक घरकुल योजनेपासून दूर आहेत, त्यांच्यासाठी मागणी करण्याऐवजी आमदार स्वतः साठी घर मागत आहेत. त्यांच्या कृतीने कन्नड तालुक्याची लाज घालवली, असा आरोप करत राष्ट्रवादी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमदार राजपूत विरोधात घरासाठी पैसे जमावण्यासाठी भीक मागो आंदोलन केले.
  • संजय शिरसाठ - संजय शिरसाठ हे शिवसेनेचे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. ते 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात राजू शिंदे आणि संजय शिरसाठ यांच्यात चुरस होती. मात्र निकालानंतर सेनेचे संजय शिरसाठ यांनी हैट्रिक करत तब्बल 40 हजार मताधिक्याने विजय मिळवत आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवले.
  • रमेश बोरनारे - बोरनारे हे शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. बोरनारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका कार्यक्रमासाठी वैजापूरात आले असताना आमदार बोरनारे आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मारहाण केल्याचा आरोप करत आमदारांच्या नात्यातील एका महिलेने वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आपला विनयभंग झाला असल्याचा आरोपही या महिलेने केला होता. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा पुरवणी जवाब नोंदवत आमदार बोरनारे यांच्यावर गुन्हा नोंद केला होता.
  • प्रदीप जैस्वाल - प्रदीप जैस्वाल हे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहे. प्रदीप जैस्वाल यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना जिल्हा सत्र न्यायालयाने सहा महिन्याची शिक्षा सुनावली होती. 20 मे 2018 च्या मध्यरात्री औरंगाबादेत झालेल्या जातीय दंगली प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी जैस्वाल यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यातील खुर्चा आणि काचांची मोडतोड करून पोलिसांना शिवीगाळ केली होती. याप्रकरणी प्रदीप जैस्वाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  • संजय रायमुलकर -रायमुलकर हे शिवसेनेचे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. रायमुलकर यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाविरुद्ध आंदोलन केले होते.
  • आमदार महेश शिंदे - महेश शिंदे हे साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. 2021 साली हे आघाडी सरकार विरोधातच उपोषणावर बसले होते. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कोरेगाव शिवसेनेचे आमदार महेश शिंदे हे वीज प्रश्नावर सरकार गंभीर नाही, असे सांगत विधिमंडळाच्या (Maharashtra Winter session 2021) पायऱ्यांवर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी बसलेले होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी, कृषिपंपाची तोंडणी, अवाजवी आलेले वीज बिल यासंदर्भात त्यांनी हे उपोषण केले. (MLA Mahesh Shinde Fast in the Assembly) सत्ताधारी पक्षाचा आमदार उपोषणाला बसल्याने त्याची चर्चा विधान भवनात सुरू होती. शेवटी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वतः येऊन महेश शिंदे यांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिंदे यांनी उपोषण मागे घेतले.
  • भरत गोगावले - भरत गोगावले हे शिवसेनेचे रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभेचे आमदार आहेत. महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून गोगावले हे 2009 व 2014 असे दोन वेळा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांचा पराभव करून विजयी झाले होते. 2019 मध्ये देखील त्यांना या मतदारसंघातून संधी देण्यात आली. आणि ते तिसऱ्यांदा विजयी झाले होते.
  • तानाजी सावंत -सावंत हे शिवसेनेचे परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी सावंत साधारण तीन महिने उस्मानाबादचे पालकमंत्री होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मी पुन्हा उस्मानाबादचा पालकमंत्री होणार असल्याचे ठामपणे आमदार सावंत सांगत होते. मात्र, सत्तास्थापनेसाठी झालेल्या नाट्य घडामोडीमुळे सावंत यांना मंत्रिमंडळातून डावलले गेले. त्यामुळे, तानाजी सावंत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. नवीन मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर तानाजी सावंत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत सहभागी झाले नसल्याने व इतर कार्यक्रमात गैरहजर असल्याने सावंत नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र, मी नाराज नाही असे सांगत उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्याला लवकरच न्याय देतील कारण उस्मानाबादने शिवसेनेसाठी भरपूर काही दिले आहे. त्यामुळे लवकरच उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास तानाजी सावंत यांनी त्यावेळी व्यक्त केला होता. 2022 साली तानाजी सावंत यांनी सोलापूरच्या सभेत बोलताना आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळाली होती. महाविकास आघाडीत आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही फक्त आदेशाची वाट पाहत आहोत, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक गदारोळ माजताना पाहायला मिळाला होता. या प्रकरणावरून शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी शिवसैनिकांचे कान टोचले होते.
  • प्रकाश आबिटकर -आबिटकर हे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मतदारसंघाचे आमदार आहेत. ते नॉट रिचेबल असल्याचे सांगितले जात आहे. आबिटकर हे शिंदे यांचे समर्थक समजले जातात.
  • संजय गायकवाड - संजय गायकवाड हे शिवसेनेचे बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2021 साली ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. गायकवाड यांनी हिंदू बांधवांना प्रोटीनयुक्त आहार घेण्याचे आवाहन केले होते. दररोज ३ ते ४ अंडी आणि एक दिवसा आड चिकन, मटन खाण्याचे त्यांनी आवाहन केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे वारकरी आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला होता.
  • नितीन देशमुख -नितीन देशमुख हे शिवसेनेचे अकोला मतदारसंघाचे आमदार आहेत. शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत गुजरातमध्ये तळ ठोकला आहे. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे अपक्षांसह 35 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत गेलेले अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांची तब्येत खराब झाली आहे. त्यांना रुग्मालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्यावर उपचार करून त्यांना पुन्हा हॉटेलमध्ये आणण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत बंड केले आहे. त्यांच्यासोबत अपक्षासह 35 आमदार गुजरातच्या हॉटेलमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्यासोबत गेलेले अकोल्याचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हामप्रमुख नितीन देशमुख यांना अस्वस्थ वाट असल्याने त्यांना सूरतमधील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करुन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
  • अनिल बाबर -अनिल बाबर हे शिवसेनेचे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 मध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघातून ते पुन्हा एकदा शिवसेनेच्या तिकिटीवर निवडून आले होते. आमदार बाबर यांनी विटा शहर वगळता मतदारसंघाच्या सर्वच भागात मताधिक्क्य घेत विजयावर शिक्कामोर्तब केला होता. आमदार अनिल बाबर यांना 1 लाख 16 हजार 974 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना 90 हजार 683 इतकी मते मिळाली होती. आमदार बाबर हे तब्बल 26 हजार 291 मतांनी विजयी झाले होते. आमदार बाबर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना सलग दुसर्‍यांदा विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत करत इतिहास घडवला होता.
  • ज्ञानराज चौगुले -चौगुले हे शिवसेनेचे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2009, 2014 आणि 2019 मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेवर सलग 3 वेळा निवडून आले आहेत.
Last Updated : Jun 21, 2022, 2:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details