मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचा आज आरोप केले. त्यामध्ये रियाज भाटी याचे नाव समोर आले आहे. रियाज भाटी हा अंडरवर्ल्डशी कनेक्शन असणारा व्यक्ती आहे. त्याचे अंडरवर्ल्ड कनेक्शनदेखील आहे. रियाज भाटी कोण आहे? ( Who is Riyaz Bhati) ते जाणून घेऊ.
आर्यन खान प्रकरणापासून नवाब मलिक हे वारंवार एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत होते. याच आरोप-प्रत्यारोपात भाजपदेखील (Riyaz Bhati NCP BJP connection)वानखडे यांच्या समर्थनात पुढे आली आहे. त्यानंतर नवाब मलिक यांचे लक्ष्य हे भाजपचे नेते झाले आहेत. नवाब मलिक यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचे नाव जयदीप राणा ड्रग पेडलरशी जोडले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यात वाक्युद्ध सुरू झाले आहे.
हेही वाचा-मुंबईतील 'या' प्रकरणात परमबीर सिंग, सचिन वाझे अन् रियाज भाटीचे कनेक्शन काय?
हा रियाज भाटी कोण आहे ते जाणून घेऊया?
रियाज भाटी हा गँगस्टर छोटा शकीलचा अत्यंत खास व्यक्तींपैकी आहे. 2006 मध्ये कमी दरात जागा मिळवण्यासाठी त्याने शकीलची मोठ्या प्रमाणात मदत घेतली. त्यावेळी हे प्रकण बाहेर आल्यानंतर भाटीवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच 2010 मध्ये अंधेरीतील जमिनीच्या विकासातून उद्भवलेल्या वादातून भाटी व त्याच्या साथीदाराने विकासकाला बंदुकीचा धाक दाखवून धमकावले होते. त्यावेळी भाटी विरोधात गुन्हा दाखल झाला होता. याशिवाय ठाण्यातही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा-फडणवीसांनी रियाज भाटी-मुन्ना यादवच्या मदतीने वसुलीचे रॅकेट चालवले, मलिकांचा 'बॉम्ब'; पहा पत्रकार परिषद
भाटी व्यवसायाने बिल्डर
भाटी पूर्वी छोटा राजनसाठी काम करायचा. राजनवर इंडोनेशियात झालेल्या गोळीबारानंतर भाटी त्याला भेटण्यासाठी तेथे निघाला होता. त्यावेळी त्याच्याकडे दोन पासपोर्ट असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याला अटक झाली होती. त्यानंतर तो छोटा शकीलचा विश्वासू व्यक्ती झाला. खंडाळा गोळीबार, मालाडमधील जमीन प्रकरणातही त्याचे नाव पुढे आले होते. रियाज भाटी मुंबईत दाऊदचा हवालाचा सर्व कारभार सांभाळायचा. तो व्यवसायाने बिल्डर आहे. पहिले त्याचे नाव 2007 आणि 2008 मध्ये खंडाळ्यात झालेला गोळीबार, 2009 मध्ये मालाडमध्ये जबरदस्तीने जमीन काबिज करण्याच्या प्रकरणात आलेले होते
रियाजकडून दोन बनावट पासपोर्ट जप्त केले आहे. पहिल्या पासपोर्टवर भाटीची जन्म तारीख 12 जून 1968 आहे. तर दुसऱ्या पासपोर्टवर तारीख फेब्रुवारी 1962 आहे.
हेही वाचा-देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले - नवाब मलिक यांचा गंभीर आरोप
परमबीर सिंग, सचिन वाझे खंडणी प्रकरणात रियाज भाटी संबंध
मुंबईतील खंडणी प्रकरणी मंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला रियाज भाटी हवा आहे. रियाज भाटी हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा अतिशय जवळचा व्यक्ती आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात झालेल्या खंडणी प्रकरणातील आरोपांमध्ये मुंबई पोलिसांना रियाज भाटी हवा आहे. या वसुलीच्या आरोपांमुळेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंध जोडले जात आहेत. खंडणी प्रकरणात भाटी याच्याविरोधात मुंबई गुन्हे शाखेला (Mumbai crime Branch) गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे गुन्हे शाखेकडून रियाज भाटीचा शोध घेतला जात आहे. सध्या तो फरार आहे. खंडणी प्रकरणी आरोपीविरोधात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु हा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला होता. या प्रकरणात भाटीला अटक करणे महत्त्वाचे आहे. रियाज भाटीया विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सचिन वाझेसाठी रियाज भाटी करत होता काम-
बार आणि रेस्टॉरंटमधून रियाज खंडणी वसूल करण्याचे काम हे सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांच्यामार्फत करत होता. सध्या सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचच्या कोठडीत आहे. गोरेगावच्या एका बांधकाम व्यावसायिकांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये सचिन वाझेच्या माध्यमातून परमबीर सिंग यांचे खंडणीतील कनेक्शन समोर आले आहे. या गुन्ह्यात परमबीर सिंग, सचिन वाझे यांच्यासह सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वारंट जारी केले आहे.
रियाज भाटीचे या राजकीय नेत्यांसोबत फोटो
रियाज भाटी यांचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत.
गँगस्टर रियाज भाटीवर हे आहेत आरोप ?
- रियाज भाटी हा कुख्यात गुंड असून त्याचा दाऊद इब्राहिम टोळीशी थेट संबंध आहे.
- भाटी याच्यावर खंडणी, जमीन बळकावणे, फसवणूक, बनावट कागदपत्रे, गोळीबार असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
- 2015 आणि 2020 मध्ये बनावट पासपोर्टच्या सहाय्याने न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारत आहेत.
- फेब्रुवारी 2020 मध्ये, भाटीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जामीनासंदर्भातील आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल रोखण्यात आले होते. यावेळी तो सौदी अरेबियाला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. यापूर्वी 2015 मध्येही त्याला विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होते.
- त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेत पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती.
- भाटीला पोलिसांनी 2013 मध्ये अटकही केली होती. तो बनावट पासपोर्टद्वारे पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.
- 2006 मध्ये त्याच्यावर मालाडमध्ये जमीन हडप आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाऊद इब्राहिम टोळीशी असलेले संबंध वापरून त्याने जमीन ताब्यात घेतली होती.
- खंडाळ्यातही त्याच्यावर गोळीबार आणि धमकीचे दोन गुन्हे दाखल आहेत.