मुंबई -आयएनएस विक्रांत प्रकरणी आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना धारेवर धरल आहे. किरीट सोमय्या व त्यांचे पुत्र अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे पिता-पुत्र ठग कुठे फरार झाले आहेत असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला आहे. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी ते बोलत होते.
राज्याच्या बाहेरून सुद्धा पैसे जमा केले - याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले, की आयएनएस विक्रांत प्रकरणी घोटाळा झालेला आहे. तो लहान घोटाला नाही. त्याची व्याप्ती फार मोठी आहे. पूर्ण महाराष्ट्रातून पैसे जमा केला आहे. किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा नील सोमय्या व त्यांची माफीया टोली यांनी हे पैसे जमा केले आहेत. राज्यात नाही तर राज्याच्या बाहेरून सुद्धा पैसे जमा केले आहेत.
राज्यपालांना इशारा - राऊत म्हणाले की, "किरीट सोमय्या आणि त्यांचे काही साथीदार भाजपची मंडळी मागील दोन दिवसांपासून सतत राजभवनाच्या पायऱ्यांवर जात आहेत. जुन्या तारखांची कागदपत्र तयार केली जात आहेत. माझी राज भावनाला विनंती आहे त्यांनी या भानगडीत पडू नये देशविरोधी कृत्यांना सात देऊ नये." असं राऊत यांनी म्हटलं आहे.
दोन ठग कुठे आहेत? -यांच्याबाबतलुकआऊट नोटीस जारी करायला पाहिजे. मेहुल चोकसी व किरीट सोमय्या यांचे जुने संबंध आहेत. मेहुल चोकसी बरोबर तर ते पळून गेले नाहीत ना? किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा नील हे दोन ठग कुठे आहेत? हे तपासणे गरजेचे आहे.
विक्रांत वाचवण्यासाठी जे पैसे गोळा केले त्या पैशाचा गैरवापर झाला. इतक्या कोटी पैशाचा हिशोब दिला नाही. हा गुन्हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. कारण याची व्याप्ती फार मोठी आहे.
राज्यपाल कार्यालयाने प्रकरण दाबू नये? -किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा यांचे संबंध पीएमसी बँक घोटाळा राकेश वाधवानशी आहे. बिल्डरांकडून पैसे गोळा करणे हे यांचे काम आहे. हे दोघे कुठे फरार झाले हे शोधणे फार महत्त्वाच आहे. किरीट सोमय्या फरार झाले आहेत. याबाबत अधिकृत वक्तव्य अद्याप का भाजपने केले नाही? राज्यपाल कार्यालयाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या माहितीप्रमाणे काही लोक दोन-तीन दिवसापासून राज्यपाल कार्यालयाच्या फेर्या मारत आहेत. परंतु, हा देशद्रोहासारखा फार मोठा गुन्हा आहे, हे समजून घ्यावे. किरीट सोमय्या व त्यांचे पुत्र फरार आहेत. अटकपूर्व जामीन घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असल्याचे मला माहिती आहे असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
पवारांच्या घरावरील हल्ला दुर्देवी! -पवारांच्या घरी हमला करणे फारच दुर्दैवी आहे. त्याप्रसंगी त्यांच्या घरांमध्ये त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार, साहेब स्वतः आणि त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे नातू उपस्थित होते. परंतु, अशा पद्धतीने हमला करणे हे निंदनीय आहे.
हेही वाचा -Gunaratna Sadavarte : सदावर्तेंना आज गिरगांव कोर्टात हजर करणार! कोर्टासमोर पोलीस तैनात