मुंबई- अलीकडे ईडीकडून अनेक आर्थिक घोटाळ्याबाबत कारवायांचे सत्र सुरु आहे. देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आता राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याचे आपण वाचत आहोत. मात्र, ईडी म्हणजे नक्की काय हे तुम्हाला माहित आहे का ? ईडीचे काम कसे चालते? त्यांचे अधिकार, ईडीचे प्रमुख आणि ईडीची कार्यालये कोठे आहेत? तर जाणून घ्या ईडी म्हणजे नक्की आहे तरी काय...
हेही वाचा - LIVE: शरद पवार आज 'ईडी' कार्यालयात जाणार; कार्यालयाबाहेर जमावबंदी लागू
ईडी म्हणजे 'इनफोर्समेंट डायरेक्टरेट'(Enforcement Directorate) ज्याला मराठील 'अंमलबजावणी संचलनालय' असे म्हणतात. ही संस्था आर्थिक गैरव्यवहार शोधून काढण्याचे काम करते. बरेचसे आर्थिक गैरव्यवहार हे परकीय चलनाद्वारे होत असतात. फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट किंवा आपण ज्याला फेमा म्हणतो. त्या कायद्याची आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत काही तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी संचलनालयाची स्थापना करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या अंतर्गत प्रशासाकीय नियंत्रणाखाली या संचलनालयाचे कामकाज चालते. त्यातील नियम, सुधारणा, बदल हे सर्व आर्थिक व्यवहार विभागाच्या अखत्यारीत येतात
हेही वाचा - आम्ही पवार साहेबांसोबत जाणारच..! राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल
अंमलबजावणी संचालनालयाची स्थापना १ मे १९५६ रोजी करण्यात आली. भारतात आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही देशात आर्थिक कायद्याचं व्यवस्थापन करणारी संस्था आहे. अंमलबजावणी संचालनालय ही संस्था अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाअंतर्गत येते.