महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पश्चिम रेल्वेचा विक्रम.. कोरोना काळात ३ हजार १०६ कोटींची कमाई - पश्चिम रेल्वेचा विक्रम

पश्चिम रेल्वेने २०२१-२२ या आर्थिक वर्षात मालवाहतूकमधून २ हजार ५२७ कोटी रुपयाचा महसूल मिळविला आहे. याशिवाय प्रवासी भाडे आणि विविध प्रकारातून ५७९ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. विशेष म्हणजे कोरोना सारख्या कठीण परिस्थितीवर मात करून पश्चिम रेल्वेने ३ हजार १०६ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. तसेच मागील वर्षीपेक्षा ६३ टक्के उत्पन्न वाढविले आहे.

Western Railway
Western Railway

By

Published : Jul 10, 2021, 9:04 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने गेल्या वर्षी सर्व मेल, एक्स्प्रेस आणि प्रवासी गाड्या रद्द केल्या. मात्र, लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये, म्हणून देशभरात अन्न, पेट्रोलियम पदार्थ, वीज निर्मितीसाठी कोळसा व अन्य वस्तूंच्या मालगाड्या आणि पार्सल गाड्या रात्रंदिवस धावत होत्या. पश्चिम रेल्वेने २०२१-२२ या आर्थिक वर्षात मालवाहतूकमधून २ हजार ५२७ कोटी रुपयाचा महसूल मिळविला आहे. याशिवाय प्रवासी भाडे आणि विविध प्रकारातून ५७९ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. विशेष म्हणजे कोरोना सारख्या कठीण परिस्थितीवर मात करून पश्चिम रेल्वेने ३ हजार १०६ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. तसेच मागील वर्षीपेक्षा ६३ टक्के उत्पन्न वाढविले आहे.

२ हजार ५२७ कोटी महसूल -

२३ मार्च २०२० रोजी देशभरातील रेल्वेसेवा कोरोनामुळे बंद करण्यात आले होती. मात्र, देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मालगाड्या, पार्सल गाड्या सुरू आहेत. पश्चिम रेल्वेने १ एप्रिल २०२१ ते ३ जुलै २०२१ या कालावधीत एकूण २०७ पार्सल गाड्या चालविण्यात आलेल्या आहेत. तर, याच कालावधीत मालगाडीद्वारे २०.९५ मिलियन टनाची वाहतूक केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत १५.८० मिलियन टन मालवाहतूक केली होती. पश्चिम रेल्वेने विविध पार्सल विशेष ट्रेनच्या माध्यमातून सुमारे ७६ हजार टन मालाची वाहतूक केली. या मालवाहतुकीमधून २ हजार ५२७ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे.

लॉकडाऊन काळात 'या' गाड्या धावल्या -

पश्चिम रेल्वेने केलेल्या मालवाहतुकीत शेतीची सामग्री, औषधे, ऑपरेशन करण्याची साधने, मासे, दूध यांचा समावेश आहे. यातून सुमारे २५.७२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. पश्चिम रेल्वेद्वारे ४७ मिल्क विशेष गाड्यांद्वारे ३३ हजार टनाहून अधिक दूधाची वाहतूक केली. ५७ कोविड-१९ विशेष पार्सल गाड्यांमधून 9 हजार टन अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आली. तर ६८ किसान रेल्वेद्वारे १६ हजार टन वजनी शेती उपयुक्त सामग्री, भाजीपाला, फुले, फळे याची वाहतूक करण्यात आली.

तीन हजार १०६ कोटी रुपयांची कमाई -

पश्चिम रेल्वेने २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३ हजार १०६ कोटी रूपयांची कमाई केली आहे. यामध्ये देशभरात मालगाडीतून मालवाहतूक करून २ हजार ५२७ कोटी, प्रवासी भाडे ३७८ कोटी, विविध प्रकारातून २०१ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. मागील वर्षीपेक्षा 63 टक्के अधिक उत्पन्न पश्चिम रेल्वेला मिळाले आहे अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे.

कोरोना योद्ध्यांमुळे शक्य -

मालवाहतुकीच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी कोरोना काळात रेल्वे कर्मचारी २४×७ सातत्याने विविध गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांत काम करत आहेत. लोको पायलट, गार्ड कुशलतेने गाड्या चालवत आहेत. ट्रॅक, सिग्नलिंग, ओव्हर हेड इक्विपमेंट्स, लोकोमोटिव्ह्ज, डबे आणि वॅगन्सचे देखभाल करणारे कर्मचारी गाड्यांची सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे सांभाळले आहे. या रेल्वेच्या कोरोना योद्धामुळे पश्चिम रेल्वेने २०२१-२२ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करता आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details