मुंबई- सुमारे दीड वर्षापूर्वी ऐन पावसाळ्यात एल्फिन्स्टन स्टेशन येथील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासन जागे झाले आहे. पावसाळ्यात एल्फिन्स्टन सारख्या दुर्घटना टाळण्यासाठी व गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी पश्चिम रेल्वे सज्ज झाली आहे.
पश्चिम रेल्वे पावसाळ्यात होणाऱ्या गर्दी नियंत्रणासाठी सज्ज - railway
पावसाळ्यात एल्फिन्स्टन सारख्या दुर्घटना टाळण्यासाठी व गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी पश्चिम रेल्वे सज्ज झाली आहे.
नुकतेच पश्चिम रेल्वेने आरपीएफ व महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या 60 कर्मचाऱ्यांना पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील स्थानकात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्यास ती हाताळण्याचे प्रशिक्षण दिले आहे. एनडीआरएफच्या पथकाच्या मदतीने अंधेरी स्थानकात रात्रीच्या वेळी याबाबतचे मॉक ड्रील घेऊन हे प्रशिक्षण दिले गेले.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर प्रवासी स्थानक व स्थानकातील पादचारी पुलाचा आधार घेतात. यामुळे दुसरी लोकल आल्यावर मोठ्या संख्येने गर्दी होते. अशा गर्दीच्या वेळी एखादी दुर्घटना घडल्यास प्रवाशांना कसे हाताळायचे, प्राथमिक नियोजन कसे करायचे याचे प्रात्यक्षिक मॉक ड्रीलच्या माध्यमातून करण्यात आले.