ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mamata Pawar Meet : पवारांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जींकडून UPA शिवाय तिसऱ्या आघाडीचे सुतोवाच - Mamata Banerjee on mumbai visit

देशात सध्या जी परिस्थिती आहे त्याला तोंड देण्यासाठी एक सक्षम पर्याय देण्याची गरज असल्याचे ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची भेट (Mamata Banerjee met NCP chief Sharad Pawar ) घेतल्यानंतर माध्यमांना सांगितले. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

Mamata Banerjee met NCP chief Sharad Pawar
Mamata Banerjee met NCP chief Sharad Pawar
author img

By

Published : Dec 1, 2021, 4:30 PM IST

Updated : Dec 1, 2021, 5:36 PM IST

मुंबई -तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जीयांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Mamata Banerjee met NCP chief Sharad Pawar ) यांची भेट घेतली. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. देशात सध्या जी परिस्थिती आहे त्याला तोंड देण्यासाठी एक सक्षम पर्याय देण्याची गरज असल्याचे ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना सांगितले.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या व्यतिरिक्त वेगळा पर्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असून जे लढतील त्या सर्वांना सोबत घेतलं जाईल असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. ममता बॅनर्जींनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्या बोलत होत्या.

माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना शरद पवार व ममता बॅनर्जी

या भेटीनंतर ममता बँनर्जी म्हणाल्या की. मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भेटायला आले होते. मुख्यमंत्री लवकर बरे होवो, अशी प्रार्थना मी करते. मुख्यमंत्री भेटू शकले नाहीत पण संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे मला भेटायला आले होते. देशात जी फॅसिझमची परिस्थिती सुरू आहे. त्याच्या विरोधात एक altetnative फ्रंट तयार केला पाहिजे. शरद पवार हे मोस्ट सिनिअर लीडर आहेत, त्यांच्यासोबत मी काम केलं आहे, म्हणून मी त्यांच्याशी पोलिटिकल कर्टसी आणि चर्चा करायला आली आहे. असे ममता म्हणाल्या.

जे लढतात अशांचा एक स्ट्रॉंग alternative हवाय, जर कुणी लढत नाही तर आम्ही काय करू? , असा टोला काँग्रेसला लगावला. तिसऱ्या आघाडीचा लीडर कोण यावर त्यांनी चर्चा करून ठरवू असे म्हणाल्या.

शरद पवार म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी फिल्ड मध्ये राहून काम केल्याने जिंकता आले. जे नवीन कायदे झालेत त्याबाबत एक सेकंड thought देणं गरजेचं आहे असं आम्हांला वाटते. कुणाला वगळण्याची गोष्ट नाही. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची आहे. ज्यांना सगळ्या सोबत जायचंय त्यांच्या सोबत यायला हवे. असे काँग्रेसबाबत पवार म्हणाले.

युपीएचे नेतृत्व कोण करणार या प्रश्नावर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या विरोधात युपीए आहे कुठे ? त्यामुळे तिसऱ्या आघाडीची गरज आहे.

आदित्य ठाकरे व संजय राऊत यांनीट्रायडेंट हॉटेलमध्येघेतली बॅनर्जींची भेट -

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Cm Mamata Banerjee) दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर (Mumbai visit) आहेत. काल (मंगळवार) सायंकाळी साडेसात वाजता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) आणि शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांची देखील भेट घ्यायची होती. मात्र मुख्यमंत्र्यांवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर अद्यापही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच मुख्यमंत्री अद्यापही बायो-बबलमध्ये असल्यामुळे त्यांची भेट ममतादीदींशी होऊ शकली नाही, अशी माहिती भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

या तीनही नेत्यांमध्ये मुंबईमधील ट्रायडेंट हॉटेल ( Trident Hotel ) येथे जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मात्र या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून, ममता बॅनर्जी जेव्हाही मुंबई दौर्‍यावर असतात त्यावेळेस उद्धव ठाकरे हे त्यांची भेट घेतात. मात्र त्यांच्यावर सुरू असलेले उपचार आणि ते स्वतः बायोबबलमध्ये असल्या कारणाने ही भेट होऊ शकलेली नाही. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये चांगला संवाद आहे. महत्वाच्या प्रत्येक मुद्द्यावर ह्या दोन्ही राज्यात संवाद होत असतो. खास करून कोविड परिस्थितीमध्ये देखील या दोन्ही राज्याने चांगला सुसंवाद ठेवला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Last Updated : Dec 1, 2021, 5:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details