महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईतील धोबी संघटनेच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा - आमदार आशिष शेलार - धोबीघाट, महालक्ष्मी

धोबी घाटातील सार्वजनिक शौचालय धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास को-ऑप. सोसायटी लिमिटेड या नोंदणीकृत संस्था चालवत होती. पण नूतनीकरणाच्या नावावर या संस्थेकडून काढून घेण्यात आले. याविरोधात स्थानिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

आशिष शेलारांनी केली पाहणी
आशिष शेलारांनी केली पाहणी

By

Published : Jun 15, 2021, 10:36 AM IST

मुंबई -महालक्ष्मी येथील प्रसिद्ध धोबीघाट येथे 1994 पासून कार्यरत असलेल्या धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास को-ऑप. सोसायटी लिमिटेड या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेले सार्वजनिक शौचालय नूतनीकरणाच्या निमित्ताने काढले आहे. त्यामुळे त्या विरोधात स्थानिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या जन आंदोलनाला भाजपाचा पाठींबा राहिल, असे भाजपा नेते व आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

ashish shelar

धोबी घाटातील सार्वजनिक शौचालय धोबी कल्याण आणि औद्योगिक विकास को-ऑप. सोसायटी लिमिटेड या नोंदणीकृत संस्था चालवत होती. पण नूतनीकरणाच्या नावावर या संस्थेकडून काढून घेण्यात आले. ही संस्था अल्पदरात ही सुविधा उपलब्ध करून देत असताना महपौरांनी आपल्या एका कार्यकर्त्याच्या संस्थेला हे काम दिले आहे. याबाबत स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. याबाबत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी धोबी घाटात जाऊन पाहणी केली. व स्थानिकांशी संवाद साधला, यावेळी स्थानिकांनी म्हणणे मांडले. ज्या संस्थेला देण्यात आले आहे ती संस्था दर वाढवणार आहे. तसेच शौचालयाचे काम पूर्ण झाले. पर्यावरण मंत्री व स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सदर शौचालयाचे लोकार्पण कार्यक्रम झाला. पण, शौचालय खुले केले नाही. दर काय असतील हे सांगितले जात नाही. त्यामुळे स्थानिक आंदोलन करणार असल्याचे स्थानिकांनी आशिष शेलारला सांगितले.

supporting laundress
स्थानिकांचा विरोधआमदार आशिष शेलार यांनी सांगितले की, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी आपण चर्चा केली आहे. स्थानिक संस्था हे शौचालय चालवण्याचे काम गेली अनेक वर्षे करत आहेत. त्यांच्या कडून एकाकी काम काढून घेणे अन्यायकारक आहे. ते काम काढून घेतले? ते कधी सुरू होणार? दर किती असणार? महापौरांनी या सगळ्यांची उत्तर देणे आवश्यक आहे. स्थानिकांचा विरोध असून त्या विरोधात ते जन आंदोलन करणार आहेत. भाजपाचा या आंदोलनाला पाठींबा असेल, असेही आमदार आशिष शेलार यांनी नागरिकांना सांगितले.
स्थानिकांचा विरोध

ABOUT THE AUTHOR

...view details