महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईचा पाणीपुरवठा सुरू.. भांडुप जलशुुद्धीकरण यंत्रणा पूर्वपदावर, मुंबईकरांना BMC चे 'हे' आवाहन

भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे बंद करावी लागली. या कारणाने मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश भागांमध्ये आज पाणीपुरवठा बाधित झाला. संकुलातील जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू करून मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Water supply resumed
Water supply resumed

By

Published : Jul 18, 2021, 10:13 PM IST

Updated : Jul 18, 2021, 10:29 PM IST

मुंबई - भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे बंद करावी लागली. या कारणाने मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश भागांमध्ये आज पाणीपुरवठा बाधित झाला. भांडुप जलशुुद्धीकरण संकुलातील नवीन आणि जुन्‍या अशा दोन्‍ही उदंचन केंद्रातील यंत्रणा टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने कार्यान्‍व‍ित होत असूून मुुंबईतील ज्‍या भागांना सायंकाळचा पाणीपुरवठा दिला जातो, त्‍या भागांना पाणीपुुरवठा टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने सुुरु करण्‍यात आला आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबईचा पाणीपुरवठा सुरू

पाणी पुरवठा सुरू -

भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे तसेच विद्युत पुुरवठा यंत्रणा बंद करावी लागली होती. या कारणाने मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश भागांमध्ये आज (१८ जुलै २०२१) सकाळपासून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला होता. भांडुप जलशुद्धीकरण संकुलात शिरलेले पावसाचे पाणी युद्ध पातळीवर उपसून गाळणी (filtration) व उदंचन (pumping) यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली. संबंधित यंत्राची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्‍यात आली. यानंतर आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करून उदंचन करणारे पंप टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने सुरु करण्‍यात येत आहेत. उदंचन सुुरु होताच भांडुप मुुख्‍य जलसंतुुलन (Main Reservoir) कुंभातील पाणीपातळी उंचावू लागली. त्‍यानंतर सायंकाळपासून पश्चिम उपनगरांसह शहर भागातील अनेक भागांमध्‍ये पाणीपुुरवठा देखील सुरू करण्‍यात आला आहे. भांडुुप संकुलातील यंत्रणा टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने कार्यान्‍व‍ित होवून पाणीपुुरवठा पूूर्वपदावर येतो आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पुन्‍हा एकदा करण्यात येत आहे.

या विभागात पाणी पुरवठा सुरू -


यामध्‍ये प्रामुख्‍याने एच/पश्चिम विभागातील चॅपल रोड परिसर, खारदांडा, के/पूर्व भागातील मोगरापाडा, पार्ले पूूर्व परिसर, के/पश्चिम विभागातील यारी रोड, पी/उत्‍तर विभागातील मढ, गांधीनगर, पी/दक्षि‍ण विभागातील बिंबीसार परिसर, आर/दक्षिण वि‍भागातील ठाकूर संकूल, लोखंडवाला संकूल, आर/उत्‍तर विभागामध्‍ये दहिसर परिसर यासोबत शहर भागामध्‍ये जी/दक्षि‍ण विभागातील तुळशीपाईप मार्ग, सेनापती बापट मार्ग परिसर, एन. एम. जोशी मार्गावर दादर ते भायखळा दरम्‍यान, तसेच जी/उत्‍तर विभागात दादर, माहिम, धारावी, डी विभागात भुुलाभाई देसाई मार्ग, ताडदेव, महालक्ष्‍मी, ए विभागात कुलाबा, कफ परेड अशा निरनिराळ्या भागांमध्‍ये टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे.

Last Updated : Jul 18, 2021, 10:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details