महाराष्ट्र

maharashtra

Rain Alert : आज पुन्हा जोरदार पावसाचा इशारा, दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

By

Published : Jul 21, 2021, 3:05 PM IST

मागील आठवड्यात गुरुवारपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस अजूनही अधून मधून मुंबईत सुरूच आहे. पुढील तीन ते चार दिवस देखील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे.

पावसाचा इशारा
पावसाचा इशारा

मुंबई -मागील आठवड्यात गुरुवारपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस अजूनही अधून मधून मुंबईत सुरूच आहे. पुढील तीन ते चार दिवस देखील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. पुढील 3 दिवस मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी येथे पुढील 2 दिवस रेड अर्लटचा इशारा देण्यात आला आहे. त्याबरोबर मुंबईला देखील उद्या सकाळपर्यंत रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे.

आज पुन्हा जोरदार पावसाचा इशारा, दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन

मुंबईत सकाळपासून रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे सखल भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे. चेंबूर आणि वडाळा येथे पाणी भरले होते. मुंबईत 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत शहर 44.4, पूर्व उपनगर 41.0, पश्चिम उपनगर 46.8 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत पाऊस जरी सुरू असला तरी पावसाचा जोर कमी असल्याने रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक सध्या तरी सुरळीत आहेत मात्र पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. ठाणे पालघर आणि रायगडसाठी पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन नागरिकांना प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मराठवाड्यात चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता

मध्य महाराष्ट्रमध्ये कोकण भागात अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि सोबतच मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासासाठी कोकणामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे. मध्य महाराष्ट्रमध्ये सुद्धा रेड अलर्ट जारी केलेला आहे. मुंबईसाठी उद्या सकाळच्या साडेआठपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. त्याच्यानंतर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अशी माहिती हवामान तज्ज्ञ शुभांगी भुत्ते यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -खरंय! टिकटॉक पुन्हा सुरू होणार? बाईटडान्सचा #TickTock नावाने नवा अर्ज

ABOUT THE AUTHOR

...view details