परभणी -औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदान प्रक्रियेत मंगळवारी दुपारी पाच वाजेपर्यंत 67.43 टक्के मतदान झाले. यात 3752 महिलांनी तर 18 हजार 310 पुरुष अशा एकूण 22 हजार 062 पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
पदवीधर-शिक्षक निवडणूक : कुठे किती टक्के झाले मतदान; पाहा LIVE अपडेट्स.. - शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणूक
19:28 December 01
17:32 December 01
सोलापूर -
पदवीधर मतदार संघासाठी सकाळी ८ ते ४ या कालावधीत झालेले मतदान
- पुरुष : 22974
- स्त्री : 6062
- एकूण : 28036
- मतदान टक्केवारी : 52.10 टक्के
शिक्षक मतदार संघासाठी सकाळी ८ ते ४ कालावधीत झालेले मतदान
- पुरुष : 8423
- स्त्री : 2053
- एकूण : 10476
- मतदान टक्केवारी : 77.12 टक्के
17:28 December 01
कोल्हापूर -
सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत पदवीधर मतदार संघासाठी झालेले मतदान
- पुरुष : ४०३८५
- स्त्री : १३५८९
- एकूण : ५३९७४
- मतदान टक्केवारी : ६०.२९ टक्के
सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत शिक्षक मतदार संघासाठी झालेले मतदान
- पुरुष : ७५९५
- स्त्री : २४५९
- एकूण : १००५४
- मतदान टक्केवारी : ८२.१६ टक्के
17:28 December 01
हिंगोली - सकाळी 8:00 ते दुपारी 4:00 वाजेपर्यंत मतदानाची एकूण टक्केवारी 53.30 टक्के.
16:43 December 01
धुळे नंदुरबार विधानपरिषद निवडणुकीसाठी दोन वाजेपर्यंत 93.36 टक्के मतदान पार पडले.
16:40 December 01
कोल्हापूर -
पुणे पदवीधर मतदार संघ मतदान
- एकूण मतदान केंद्रे : २०५
- पुरुष पदवीधर मतदार : ६२७०९
- स्त्री पदवीधर मतदार : २६८२०
- एकूण पदवीधर मतदार : ८९५२९
सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत झालेले मतदान
- पुरुष : ३०७९६
- स्त्री : ९७८४
- एकूण : ४०५८०
मतदान टक्केवारी : ४५.३३ टक्के
- शिक्षक मतदार संघ मतदान
- एकूण मतदान केंद्रे : ७६
- पुरुष शिक्षक मतदार : ८८७९
- स्त्री शिक्षक मतदार : ३३५८
- एकूण शिक्षक मतदार : १२२३७
सकाळी ८ ते दुपारी २ कालावधीत झालेले मतदान
- पुरुष : ६२८१
- स्त्री : १९३४
- एकूण : ८२७५
- मतदान टक्केवारी : ६७.१७%
16:37 December 01
औरंगाबाद -मराठावाडा पदवीधर मतदारसंघासाठीदुपारी दोनपर्यंत एकूण मतदान 37.8 टक्के झाले. परभणीत सर्वात जास्त 41.8 टक्के आणि सर्वात कमी लातूर 32.5 टक्के मतदान झाले. तर औरंगाबादमध्ये 2 वाजेपर्यंत 36.91 टक्के मतदान झाले.
16:37 December 01
नागपूर -नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक - दोन वाजेपर्यंत ३२.९२ टक्के मतदानाची नोंद झाली. दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या मतदानामध्ये 35.15 टक्के पुरुषांनी तर 29.49 टक्के महिला पदवीधर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्हानिहाय झालेले मतदान नागपूर 28.54 टक्के, भंडारा-37.69 टक्के, चंद्रपूर-36.89 टक्के, गोंदिया-33.03 टक्के, गडचिरोली-40.54 टक्के, वर्धा-38.84 टक्के.
16:36 December 01
पुणे - पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दुपारी 2 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी - पदवीधर - 37.10 टक्के, शिक्षक- 54.03 टक्के.
16:35 December 01
वर्धा -नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज 12 ते 2 पर्यंत 38.83 टक्के मतदान झाले. यंदा मागील निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ होताना दिसत आहे.
16:35 December 01
सांगली - जिल्ह्यातील 2 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी- पुणे पदवीधर 36.58 टक्के तर शिक्षक मतदार संघात 57.51 टक्के मतदानाची नोंद.
16:34 December 01
परभणी -औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदान प्रक्रियेत परभणी जिल्ह्यात दुपारी 2 वाजेपर्यंत 14.07% मतदान झाले. यात 2,067 महिलांनी तर 11 हजार 370 पुरुषांनी म्हणजेच एकूण 13 हजार 437 मतदारानी मतदानाचा हक्क बजावला.
16:33 December 01
हिंगोली - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात दुपारी २:०० वाजेपर्यंत ३४.२६ टक्के मतदान झाले आहे.
15:59 December 01
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. मात्र सांगलीत भिलवडी गावात मतदान केंद्रावर गर्दी झाली. त्यामुळे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. भिलवडी गावात पुणे पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.
13:13 December 01
सांगलीत पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज..
सांगलीच्या भिलवडी गावात मतदान केंद्रामध्ये गर्दी झाल्यामुळे, अनावश्यक लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
12:42 December 01
कोल्हापुरातील दुपारी १२ वाजेपर्यंतचे मतदान..
कोल्हापुरात पदवीधर मतदारसंघासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत ११.७५ टक्के मतदानाची नोंद झाली. तर, शिक्षक मतदारसंघासाठी एकूण १८.२२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
12:41 December 01
अमरावतीमध्ये सकाळी ११ पर्यंत १६ टक्के मतदानाची नोंद..
अमरावती : शिक्षक मतदार संघासाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 16 टक्के मतदानाची नोंद झाली असून, मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह दिसतो आहे.
12:29 December 01
सोलापुरात पहिल्या दोन तासांमधील मतदानाची आकडेवारी..
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी पहिल्या दोन तासामध्ये सोलापूर जिल्ह्यात पदवीधर मतदार संघात एकूण 7.69 टक्के तर शिक्षक मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातून 12.33 टक्के मतदान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मतदान केंद्रात मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात पदवीधर अपेक्षा शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे.
12:03 December 01
उस्मानाबादमध्ये कोरोनाची खबरदारी घेत 74 केंद्रावर सुरुये मतदान..
उस्मानाबाद -औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी आज सकाळपासून सकाळी ८ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 74 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. याकरिता जिल्ह्यातील 33 हजार 632 मतदार पदवीधर आमदाराच्या निवडीसाठी मतदानाच्या माध्यमातून कौल देणार आहेत.
12:02 December 01
अमरावती शिक्षक मतदारसंघातील मतदान शांततेत सुरू..
अकोला -अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. अकोला जिल्ह्यांमध्ये 12 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी अकोला शहरात दोन मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांमध्ये पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग त्यासोबतच निवडणूक विभागाचे सर्व कर्मचारी हजर आहेत. त्या ठिकाणी शांततेमध्ये मतदान प्रक्रिया राबविल्या जात असून कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्यासाठीचे नियम मात्र याठिकाणी काटेकोरपणे पाळल्या जात आहेत.
11:34 December 01
पहिल्या दोन तासांमधील पुण्यातील आकडेवारी..
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सकाळी 10 पर्यत 8.52 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यापैकी पुण्यात 7 टक्के, सांगली 8.98 टक्के, सातारा 7.21 टक्के, सोलापूर 7.69 टक्के, आणि कोल्हापुरात 11.75 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
11:33 December 01
लातूर जिल्ह्यात 88 केंद्रावर मतदान सुरू; संमिश्र प्रतिसाद..
लातूर : औरंगाबाद विभागातील पदवीधर निवडणुकीत नशीब आजमवण्यासाठी अनेक उमेदवार रिंगणात होते. पदविधारांचे प्रश्न, आश्वासने घेऊन उमेदवार मतासरांसोमर जात होते. आज मतदार नेमकं कुणाला पसंती देणार पाहावे लागणार आहे. लातूर जिल्ह्यातील 88 केंद्रावर ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. तर जिल्ह्यात 41 हजार 190 मतदार आहेत.
11:30 December 01
देवेंद्र फडणवीसांनी केले मतदान..
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करणे आवश्यक असल्याचे म्हणत, त्यांनी यावेळी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
10:50 December 01
नितीन राऊतांनी बजावला मतदानाचा हक्क..
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरता राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. उत्तर नागपूर येथील नागसेन शाळेत जाऊन राऊत यांनी मतदान केले आहे. यावेळी जास्तीत जास्त मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढविण्याच आवाहन राऊत यांनी केले आहे.
10:48 December 01
औरंगाबादमध्ये ५.९५, तर वर्ध्यात ९ टक्के मतदान..
सकाळी दहा वाजेपर्यंत औरंगाबादमध्ये ५.९५ टक्के मतदानाची नोंद झाली. तसेच, वर्ध्यामध्ये ९.१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
10:16 December 01
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांनी केले मतदान..
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
10:15 December 01
चंद्रकांत पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क..
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला.
10:14 December 01
जालन्यात सकाळी नऊ पर्यंत तीन टक्के मतदान..
जालना :औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी आज सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली, आणि पहिला एक तासांमध्ये तीन टक्के मतदान झाले आहे. मतदानासाठी पदवीधर मतदारांनी सामाजिक अंतर पाळत मतदान केंद्रावर रांग लावली आहे.
10:13 December 01
वर्ध्यात सुरळीत मतदान सुरू..
वर्धा :नागपूर पदवीधर मतदार संघासाठी वर्ध्यामध्ये मतदान प्रक्रियेला आज सकाळपासून सुरवात झाली आहे. वर्ध्यात 35 केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यात 23 हजार 68 मतदार आहे. सकाळपासूनच पदवीधरांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आलेले आहेत. सकाळच्या पहिल्या टप्प्यात लोकांनी मतदानाचा हक्क बजावत अनेक पदवीधर आपल्या कर्त्याव्यावर जाताना दिसून आले. पदवीधर मतदार हे लोकशाही बळकट करण्यासाठी घराबाहेर पडताना दिसून आलेले आहे.
10:12 December 01
सांगलीत भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुखांनी केले मतदान..
सांगली - पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी मतदानला सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली. भाजपाचे उमेदवार संग्रामसिह देशमुख यांनी आज सकाळीच कडेगाव मध्ये बाजवला मतदानाचा हक्क. जिल्ह्यातील 191 बूथ केंद्रावर मतदानाला शांततेत मतदान प्रक्रिया सुरु आहे.
10:11 December 01
बीडमध्ये मतदारांचा चांगला प्रतिसाद..
बीड - औरंगाबाद विभाग पदवीधर पदवीधर मतदार संघाचे मतदान मंगळवारी सकाळी आठ वाजता सुरू झाले बीड जिल्ह्यात एकूण 131 मतदान केंद्रावरून मतदानाची ची प्रक्रिया सुरु असून 64000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शांततेत मतदान सुरू झाले असून सकाळच्या सत्रांमध्ये पदवीधर मतदारांचा चांगला प्रतिसाद असल्याचे चित्र बीड परिसरातील मतदान केंद्रांवर पाहायला मिळाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मतदान केले जात आहे.
10:03 December 01
कोल्हापुरात मतदानाला सुरुवात..
कोल्हापूर :पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील मतदानाला सुरुवात झाली असून जवळपास 281 मतदान केंद्रांवर कोल्हापूर जिल्ह्यात मतदान होत आहे. त्यासाठी जवळपास साडेतीन हजार हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मतदाराची तपासणी केली जात आहे. याठिकाणी सोशल डिस्टन्स राखण्याबाबत सुद्धा सूचना दिल्या जात असून त्यापद्धतीने बॉक्स सुद्धा मार्क करण्यात आले आहेत. आत्तापासूनच मतदान केंद्रावर मतदार यायला लागले असून सायंकाळी 5 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. याबाबतच अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...
10:03 December 01
औरंगाबादेत मतदानाला सुरुवात..
औरंगाबाद -मराठवाडा पदवीधर मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यात एकूण 3,74,045 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ज्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात 1,06,500 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने मतदान केंद्राबाहेर निवडणूक कर्मचारी मतदारांची शाररिक तपासणी करत आहेत. ऑक्सिजन मात्रा तपासून हातावर सॅनिटायजर लावून मतदान केंद्रावर मतदारांना प्रवेश दिला जात आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रात गेल्यावर मतपत्रिका हाताळणीबाबत अधिकारी माहिती देत आहेत. दर दोन तासाला किती टक्के मतदान झालं याबाबत निवडणूक अधिकारी माहिती देणार आहेत..
09:35 December 01
सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क..
खासदार सुप्रिया सुळे यांनी पदवीधर निवडणुकीसाठी आज बारामतीत मतदान केलेा. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधकांना बोलण्यासारखे काहीच न राहिल्याने ते सातत्याने सरकार पडणार असल्याचे बोलतात. तसेच त्यांची संघटना टिकवण्यासाठी व त्यांच्या कार्यकर्त्यातील उत्साह कमी झाला आहे. त्यामुळे ते सरकार पडणार पडणार असल्याचे वारंवार बोलतात, अशी टीका यावेळी सुळेंनी केली.
08:38 December 01
नितीन गडकरींनी केले मतदान..
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पदवीधर निवडणुकीच्या मतदानासाठी नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
08:37 December 01
नागपूरमधील मतदानास सुरुवात; पाहा आढावा..
08:36 December 01
मतदानास सुरुवात..
सकाळी आठ वाजेपासून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानास सुरुवात झाली आहे.
07:07 December 01
पदवीधर-शिक्षक निवडणुकांसाठी आज मतदान..
मुंबई :विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी आज मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजपा आमने-सामने असणार आहेत. पाच मतदारसंघांमध्ये या निवडणुका पार पडणार आहेत. यामधील पुणे आणि नागपूरकडे जास्त लक्ष असणार आहे. तीन डिसेंबरला या निवडणुकांचा निकाल लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता आहे. कोरोना काळातही मतदारांना त्यांच्या सुरक्षिततेची हमी देत जास्तीत जास्त प्रमाणात मतदान कसे पार पडेल याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.
असे आहेत मतदारसंघ..
पुणे पदवीधर आणि शिक्षक, मराठवाडा पदवीधर, नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक अशा पाच मतदरासंघांमध्ये निवडणुका पार पडत आहेत.
पुण्यात प्रतिष्ठा पणाला..
महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघात भाजपकडून संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादीकडून अरुण लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यांच्यामध्ये मुख्य लढत असली, तरी माजी आमदार शरद पाटील आणि आणखी ६२ उमेदवारही या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे ही जागा कायम राखण्यासाठी भाजपला जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे प्रा. जयंत आसगावकर आणि भाजप पुरस्कृत शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार यांच्यात लढत होत आहे.
नागपूर पदवीधर..
नागपूर विभागातून पदवीधर निवडणुकीसाठी एकून सहा जिल्हे आहेत. त्यामुळे, प्रत्येक उमेदवार या सहाही जिल्ह्यात पोहोचण्यासाठी धडाडीने प्रयत्न करत होता. निवडणुकीत काही मोजकीच नावे सध्या चर्चेत आहे. भाजपकडून संदीप जोशी, काँग्रेसकडून अभिजीत वंजारी, तर विदर्भवादी नितिन घोंगे यांच्यासह अपक्ष म्हणून नितेश कराळे ही नावे सध्या चर्चेत आहेत. असे असले तरी गेल्या ५८ वर्षापासून नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपकडे राहिला आहे. त्यामुळे, यावर्षीही तो भाजपकडेच राहावा यासाठी भाजपचे सर्वच मोठे नेते प्रचारात रंगल्याचे पाहायला मिळाले.
मराठवाडा पदवीधरमध्ये काय परिस्थिती..
मराठवाडा पदवीधर मतदार संघात एकूण 3,74,045 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये 813 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. गेल्या बारा वर्षांपासून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण दोन वेळा या मराठवाडा पदवीधर मतदार संघात निवडणून आले. हा तसा भाजपचा पारंपरिक मतदार संघ मनाला जातो. मात्र, 2008 मध्ये राष्ट्रवादीने हा मतदार संघ भाजपकडून ओढून घेतला. यावेळी पुन्हा विजय मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघ..
अमरावती विभागात होत असलेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 19 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. भाजपचे नितीन धांडे, महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. याशिवाय माजी कृषीमंत्र्यांची बहीण, शिक्षक महासंघ, शिक्षक भारती संघटना यांच्या उमेदवारीमुळे ही लढत बहुरंगी होणार आहे.