महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

संविधानासाठी 'सपा'ला मतदान करा - प्रकाश आंबेडकर - प्रकाश आंबेडकर समाजवादी पार्टी

संविधान वाचवण्यासाठी समाजवादी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकल्यास संविधान बदलतील, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर

By

Published : Feb 8, 2022, 4:31 PM IST

मुंबई - उत्तर प्रदेश विधानसभेच्या (UP Election 2022) पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारीला होत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषद घेत, समाजवादी पक्षाला मतदान (Samajwadi Party) करण्याचे आवाहन केले आहे. आपल्याला संविधान वाचवायचे असेल तर आता उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला मतदान करा, असं आंबेडकर यांनी म्हटले आहे.

'RSS, भाजववाले संविधान बदलतील' -

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकल्यास संविधान बदलतील. त्यामुळे आम्ही समाजवादी पक्षाला पाठिंबा देत आहोत. संविधान वाचवायचे असेल तर भाजपचा पराभव केला पाहिजे."

'बसपा आणि चंद्रशेखर आझाद या दोघांचीही प्ररिस्थिती दयनीय'-

"आम्ही आंबेडकरवाद्यांना विनंती करतो आता बसपाचा विचार करू नका, चंद्रशेखर आझाद यांचा विचार करू नका, सध्या तुम्ही संविधानाचा विचार करा आणि समाजवादी पक्षाला मतदान करा. सध्या बसपा आणि चंद्रशेखर आझाद या दोघांचीही प्ररिस्थिती दयनीय आहे. आंबेडकरवाद्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. पण, अस्तित्व नंतरही निर्माण करता येतं. त्यामुळे सध्या अस्तित्वाचा विचार सोडा आणि मानवतेचा विचार करा", असे आंबेडकर म्हणाले.

'रामदास आठवले भाजपचेच'-

आम्ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक गांभीर्याने घेतली असून, पूर्ण ताकदीने लढणार आहोत. या निवडणुकीत आमच्यासोबत युती करण्यासाठी सगळ्यांना मार्ग खुले आहेत. फक्त भाजपला आमचे दरवाजे बंद आहेत. रामदास आठवले हे भाजपचेच आहेत आणि त्याचे चिन्ह देखील कमळच आहे. आम्ही त्यांच्यासोबत युती करणार नाही, असेही आंबेडकर म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details