ठाणे - पीपीई किट्समध्ये बांधलेला मृतदेह जिवंत असल्याचा व्हिडीओ ४ दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामधील व्यक्ती माझे वडील रामशरण गुप्ता असल्याचा दावा उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या निर्मला गुप्ता या महिलेने महिलेने केला. तसेच बांद्रा पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दाखल केल्याची माहिती दिली. मात्र, हा व्हिडीओ कधीचा आहे, याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. दुसरीकडे १० महिन्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमुळे हा प्रकार समोर आला आहे. मात्र त्या व्हायरल व्हिडिओचे गूढ अद्यापही कायम आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर-४ आयप्पा मंदिर परिसरात राहणाऱ्या निर्मला गुप्ता यांचे वडील रामशरण गुप्ता हे मुंबई चेंबूर परिसरात राहत होते. गेल्या वर्षी २४ जूनला त्यांना निमोनियाचा त्रास झाल्याने, त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. २७ जून रोजी त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांना कोविड रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना २९ जून रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने कुटुंबाला सांगून अंत्यसंस्कारसाठी स्मशानभूमीत बोलाविले. पीपीई किट्समध्ये बांधण्यात आलेल्या मृतदेह बारीक व उंचीने कमी असल्याने, गुप्ता कुटुंबांनी संशय व्यक्त केला. त्यांनी मृतदेहाचा चेहरा दाखविण्याची विनंती केली. मात्र कोविडचे कारण देऊन त्यावेळी मृतदेहाचा चेहरा दाखविण्यात आला नव्हता.
10 महिन्यापूर्वी वडील समजून दुसऱ्याच मृतदेहावर अंत्यसंस्कार-
29 जूनला त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले. त्यानंतर वांद्रा स्मशानभूमीत रामसरन यांच्यावर कुटूंबियांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र तीन दिवसांपूर्वी एका रुग्णांचा रॅप केलेला रुग्णवाहिकेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ मृत रामसरण गुप्ता यांच्या कुटूंबियांनी देखील पहिला. त्यानंतर मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. व्हिडिओमध्ये दिसणारे हे आपले वडील असल्याचा दावा त्यांची मुली निर्मला व शर्मिला गुप्ता यांनी केला. शिवाय घरातील इतर सदस्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांना देखील मानसिक धक्का बसला. त्यामुळे आपण वडील समजून कोणावर अंत्यसंस्कार केले, असा प्रश्न रामशरण यांच्या कुटुंबियांना पडला आहे. रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला असून याप्रकरणी त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देखील दिला आहे.
आता माझे वडील कुठे-
ज्यावेळी माझ्या वडिलांच्या मृतदेह गुंडाळलेल्या अवस्थेत होता. त्याचवेळी हे माझे वडील नसल्याची खात्री झाली होती. मात्र त्यांचा चेहरा दाखवला नसल्याने आम्ही त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र या व्हायरल व्हिडिओनंतर आमची खात्री झाली आहे, की आम्हाला दुसऱ्याच कोणाचे शव देण्यात आले आणि आम्ही त्यावर अंत्यसंस्कार केले. आता माझे वडील कुठे आहेत, असा सवाल त्यांची मुलगी करत असून आम्हाला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे.
सर्वाधिक वाचल्या गेलेल्या बातम्या
निवृत्त पोलिसासोबत झालेल्या झटापटीत सराईत गुन्हेगाराचा मृत्यू, बघा थरारक VIDEO