मुंबई- शहरातील झाडांची संख्या कमी होत असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. याची तीव्रता कमी करण्यासाठी पालिकेने शहरात जास्तीत जास्त हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबईत फुलणार व्हर्टिकल गार्डन्स; पालिका प्रशासनाचा अनोखा उपक्रम - mumbai municipal corporation news
शहरातील झाडांची संख्या कमी होत असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. याची तीव्रता कमी करण्यासाठी पालिकेने शहरात जास्तीत जास्त हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
यासाठी दादर येथे शिवाजी पार्क नजीकच्या बस स्टॉपवर उभी उद्याने(व्हर्टीकल गार्डन) बसवण्यात येणार आहेत. यामुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल. तसेच परिसर सुशोभिकरणाला मदत होणार आहे. शिवाजी पार्क परिसरातील जुन्या महापौर बंगल्यापासून या प्रयोगाची सुरुवात करण्यात आली आहे. या परिसरातील आणखी आठ बस स्टॉपवर अशा प्रकारे झाडे बसवण्यात येणार आहेत. यामुळे परिसराचे सौंदर्य खुलणार आहे.
फुटपाथचा वापर केल्याने रस्त्यांवरील अपघातांची संख्या कमी होईल, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. तसेच अन्य उपक्रमांचाही यामध्ये समावेश आहे. यामध्ये इको टॉयलेट, ठराविक अंतरावर बैठक व्यवस्था, पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि बगीचा असलेली ४.५ किमी लांबीचे युनिक फुटपाथ माहीम कॉजवे ते सिद्धिविनायक मंदिरपर्यंत तयार करण्यात येत आहे. याच धर्तीवर आता दुभाजक, वाहतूक बेटांवर छोटे बगीचे, शिवाजी पार्क-दादरमधील ‘बेस्ट’ बस स्टॉपवर उभी उद्याने तयार करण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे.